शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

सरकारी मुर्दाडपणाची रस्त्यावरून वरात!

By admin | Published: December 23, 2014 9:43 PM

रुग्णवाहिका चालकांचा नकार : आजारी आईसाठी ‘तो’ अर्धा किलोमीटर स्ट्रेचर घेऊन धावला --लोकमत विशेष

सातारा : सरकारी कारभाराबाबत लोकांमधून नेहमीच ओरड होत असते. प्रत्येक कामात पैसे मागण्याची सवय किती घातक बनत चाललीय, याचा धक्कादायक प्रत्यय देणारी घटना साताऱ्यात घडली. रुग्णवाहिकेअभावी आपल्या आजारी आईला स्ट्रेचरवरुन घेऊन जाताना एका हतबल गरीब मुलाला अर्धा किलोमीटर रस्त्यावर प्रचंड कसरत करावी लागली. मंगळवारी दुपारी सातारा शासकीय रुग्णालयात सरकारी मुर्दाडपणाची निघालेली ही ‘वरात’ हजारो लोकांनी याची देही याची डोळा पाहिली.शांता बापूराव घाडगे (वय ७०, रा. फत्यापूर, ता. सातारा) या पाय घसरुन पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रिया कितपत यशस्वी झाली. हे पाहण्यासाठी त्यांच्या पायाचा एक्स रे काढण्याचा सल्ला रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी मंगळवारी तिच्या मुलाला दिला. एक्स रे काढण्यासाठी रुग्णालयातील कोणतीही सोय नसल्याने त्यांना सांगत खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध आईला दुसऱ्या रुग्णालयात कसे न्यायचे, हा प्रश्न मुलासमोर उभा राहिला. त्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी घाडगे कुटुंबियांच्या दु:खाकडे डोळेझाक करत अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी केली. एवढे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने या हतबल मुलाने अखेर नाईलाजाने निर्णय घेतला.रुग्णालयाच्या कोपऱ्यात पडलेले स्ट्रेचर घेऊन त्यावरच आईला ठेवले. अन् स्ट्रेचर स्वस्त: ढकलत तो रुग्णालयातून बाहेर निघाला. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला मदत करण्याचीही तसदी घेतली नाही. स्ट्रेचर ढकलत तो शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. सुमारे अर्धा किलोमीटरवरील पोवईनाक्याजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात जायचे होते. मात्र, या मार्गात असलेल्या तीव्र चढावर स्ट्रेचर ढकलताना त्याला कसरत करावी लागली. एक्स रे काढल्यानंतर सुमारे तासाभरानंतर पुन्हा आईला स्ट्रेचरवरच घेऊन तो जिल्हा शासकीय रुग्णालयात आला. या प्रकारामुळे शासकीय यंत्रणा किती संवेदनशून्य बनली आहे. याचा प्रत्येय पाहावयास आला. (प्रतिनिधी)‘कट प्रॅक्टिस’चा विषय पुन्हा ऐरणीवर...जिल्हा शासकीय रुग्णालयात एक्स-रेची सोय असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. परंतु, ही सोय असतानाही या रुग्णाला खासगी रुग्णालयाचा रस्ता कोणी व का दाखवला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘कट प्रॅक्टीस’संदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.सरकारी रुग्णवाहिकेला पैसे घेतले जात नाहीत. परंतु, अशाप्रकारे कोणी पैसे मागितले असतील तर त्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करू.- डॉ. सुरेश जगदाळे,जिल्हा शल्य चिकित्सकसुरक्षा रक्षकांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते.सातारा जिल्हा रुग्णालयातून शांता घाडगे यांना त्यांच्या मुलाने मंगळवारी असे स्ट्रेचरवरुन नेले.