चाफळ : तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील येथील श्रीराम मंदिरात मंगळवार, दि. १५ रोजी सीतामाई यात्रा होत आहे. या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय बैठक पार पडली.पाटणचे मंडलाधिकारी हणमंतराव शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील श्रीराम मंदिरातील समर्थ सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे, चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे गणेश भोसले, सरपंच अलका पाटील, उपसरपंच उमेश पवार, गावकामगार तलाठी एस. एम. दूधगावकर, एस. आर. देशमुख, विश्वस्त अनिल साळुंखे, चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक बा. मा. सुतार, सागर चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.यात्रेस मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची वाढती संख्या लक्षात घेता या प्रशासनाकडून शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असून, यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका बजावावी, असे आवाहन पाटणचे मंडल अधिकारी हणमंतराव शेजवळ यांनी केले.दक्षिण महाराष्ट्राची काशी समजल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्रास पर्यटनस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळालेला आहे. चाफळच्या या सीतामाई यात्रेला तीन दशकांची परंपरा आहे. सध्या येथे येणाऱ्या महिला भाविकांना सीतामाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात बॅरिकेट उभारण्यात येत आहेत. तर पिण्याच्या पाण्यासह शेजारील शेतामध्ये वाहन पार्किंगची सुलभव्यवस्था करण्यात आली आहे.
सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 3:02 PM
तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील येथील श्रीराम मंदिरात मंगळवार, दि. १५ रोजी सीतामाई यात्रा होत आहे. या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय बैठक पार पडली.
ठळक मुद्देसीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक विविध विभागांना सूचना; पोलीस अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती