शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कऱ्हाडात वीजबिले फाडून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:59 AM

यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. ...

यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. समीर देसाई, उत्तमराव खबाले, राज्य संघटक दीपक पाटील, तात्या पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी दुपारी शहरातील दत्त चौकात जमा झाले. तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शासनासह वीज वितरण कंपनीच्या धोरणाचा निषेध करीत बिले फाडण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या शेतकरी व शेतमजुरांकडे घरखर्चासाठीही पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. अशा कालावधीत शासनाने त्यांना मदत करणे गरजेचे असताना याउलट त्यांच्या शेतीपंपांचे व घरातील वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून सरकार करीत आहे. त्यातच, वीजबिले चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे. भरमसाट वाढ करून शेतक-यांच्या माथी बिले मारण्यात आली आहेत. महावितरणने वसुली तत्काळ थांबवावी. ज्या शेतक-यांचे कनेक्शन तोडले आहे, ते कनेक्शन पूर्ववत जोडावे. अन्यथा, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

- चौकट

शासनच शेतक-यांना देणे लागते!

गतवर्षी नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, आजअखेर ती मदत मिळालेली नाही. उसाला एकरकमी एफआरपी मिळालेली नाही. पीकविमा मिळालेला नाही. अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा प्रकारे शासनच शेतक-यांना देणे लागत असताना कनेक्शन तोडण्याचे पाप शासनाकडून सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

फोटो : २२केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीजबिले फाडून शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध केला.