शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकार जगू देईना... कारखाने मरू देईनात!

By admin | Published: September 03, 2015 10:10 PM

शेतकरी अडचणीत : पाणीटंचाईमुळे ऊसलागण, गाळपावर शासन लावणार निर्बंध

कोरेगाव : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि भरवशाचे पीक असलेल्या उसावर गदा आणण्याचा खटाटोप शासनस्तरावरुन सुरु आहे. पाण्याचा अत्यल्प साठा हे त्यामागील कारण दाखविले जात असले तरी त्यात खरे मरण आहे ते शेतकऱ्याचेच. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कारखान्यांनी अपेक्षित दर दिलेला नाही आणि हप्त्यांचे टप्पे देखील वेळेत काढले नसल्याने शेतकरी अगोदरच देशोधडीला लागला आहे. एकूणच सरकारची नवी भूमिका म्हणजे ‘सरकार जगू देईना... कारखाने मरू देईनात’ अशीच शेतकऱ्यांसाठी झाली आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वीच सत्तेवर आलेल्या सरकारने पावसाचे कमी झालेले प्रमाण, दुष्काळसदृश परिस्थिती पाहून धरणातील पाणीसाठे पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याचे नियोजन पाहता ऊस पिकासाठी पाणी जास्त लागत असल्याचे कारण देऊन ऊस लागणीवर व गाळपावर निर्बंध लावण्याचे सूतोवाच केले आहे. सरकारचा हा निर्णय साखर कारखानदारीचे आगर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता कोरेगाव, खटाव, माण, फलटण व खंडाळा हे पाच तालुके दुष्काळी म्हणून गणले जातात. त्यामध्ये कोरेगाव आणि खंडाळ्याचा अंशत: समावेश होतो. पाचही तालुक्यांमध्ये पाण्याचे स्त्रोत कमी असले तरी गेल्या काही वर्षांपासून धोम, धोम-बलकवडी, कण्हेर आणि उरमोडी धरणाच्या पाण्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी उसासारख्या नगदी पिकाला हात घातला आहे. केवळ सातारा नव्हे तर पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने या पाच तालुक्यातील उसावर विसंबून असतात, हे नाकारू शकत नाही. उसाच्या पैशांवर पाचही तालुक्यांनी चांगला विकास साधला आहे. राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीकडे दुर्लक्ष केल्याने कारखानदारी आर्थिक अडचणीत येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर न दिल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आला आणि शेतकरी संघटनांनी कारखानदारीला टार्गेट करण्यास सुरुवात केली. सातारा जिल्ह्यात आणि या पाच तालुक्यांमध्ये शेतकरी आंदोलनांनी अधिक धग पकडली होती. शेतकरी आंदोलनानंतरही कारखान्यांनी एफ. आर. पी. प्रमाणे दर देण्यास असमर्थता दर्शविली. त्याचबरोबर हप्त्यांचे टप्पे देखील वेळेत काढले नसल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. सरकारने दुष्काळाची चाहूल ओळखून उपाययोजना करण्याकडे लक्ष केंद्रित करावयास हवे होते, मात्र त्यांनी वेळकाढूपणा करत थेट शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारीला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील विकासात्मक डोलारा कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकट्या सातारा जिल्ह्यात ९ साखर कारखाने असून, नजीकच्या पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील १० ते १२ कारखाने सातारा जिल्ह्याच्या उसावरच बऱ्यापैकी अवलंबून असतात. सरकारने उसावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिम महाराष्ट्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांसह शासनाचेही नुकसानसाखर कारखानदारी केवळ साखर निर्मिती करणारा उद्योग राहिलेला नाही. उपपदार्थ निर्मिती आणि शैक्षणिक संस्थांबाबत कारखानदारी पुढे आलेली आहे. वीज, सेंद्रिय खत, डिस्टीलरी व बगॅस निर्मिती कारखाने करत असून, त्यापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. कारखान्यांसह शेतकऱ्यांकडून उसावर अनेकविध कर आकारले जात असून, त्याचा फायदाही सरकारलाच होत आहे. त्यामुळे सरकारने केवळ दुष्काळाच्या लेबलखाली ऊस लागण आणि गाळपास प्रतिबंध केल्यास शेतकऱ्यांसह सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. साखर कारखान्यांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना देखील थोडाफार फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.