कऱ्हाडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवरायांची ही ऐतिहासिक मूर्ती सोमनाथ सुधीर भोसले यांनी तयार केली आहे. दुर्गप्रेमी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास इतिहास संशोधक तथा दुर्ग अभ्यासक के. एन. देसाई, बाबासाहेब भोसले, जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठल महाराज स्वामी, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावस्कर, माजी नगरसेवक सुहास पवार, अख्तर आंबेकरी, जयंत बेडेकर उपस्थित होते.
के. एन. देसाई यांनी आपल्या दुर्ग अभ्यास व इतिहास संशोधनाबाबतचे अनुभव सांगत युवा पिढीने दुर्ग भ्रमंतीसह दुर्ग संवर्धन कार्यास झोकून द्यावे असे सांगितले. आज धावपळीच्या युगात आणि देशातील, राज्यातील सद्य:स्थितीचा विचार करता युवा पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मार्गदर्शक आहेत. त्यामुळेच युवा पिढीने शिवचरित्राचा अभ्यास करावा आणि त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करावे, असे आवाहन केले.
यावेळी कऱ्हाड व पाटण तालुक्यातील विविध दुर्ग संवर्धन संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. आशिष माने यांनी सुधीर भोसले यांच्या कलाकृतीबाबत माहिती दिली. राघवेंद्र कोल्हापुरे यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य सागर आमले यांनी आभार मानले. प्रेरणा मंत्राद्वारे कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो : १४केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी दुर्ग अभ्यासक के. एन. देसाई, बाबासाहेब भोसले, विठ्ठल महाराज स्वामी, विनायक पावस्कर, आदी उपस्थित होते.