सातारा : राज्यपाल रमेश बैस दि.२१ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक, क्षेत्र महाबळेश्वर, मधाचे गाव मांघर आदी ठिकाणी भेटी देणार आहेत.राज्यपाल रमेश बैस यांचे दि.२१ रोजी सायंकाळी सहा वाजता महाबळेश्वर राजभवन येथे आगमन होणार आहे. दि.२२ रोजी दुपारी ३ वाजता राजभवन महाबळेश्वर येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार आहे, तर दुपारी ३.३० वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. यानंतर दुपारी ४.३० वाजता महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी ते करणार आहे.दि.२३ रोजी राज्यपाल बैस सकाळी १०.१५ वाजता श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे दर्शन पूजेसाठी जाणार आहेत. यानंतर ११.१५ वाजता राजभवन येथे आगमन व राखीव, दुपारी २.३० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अधिकाऱ्यांशी बैठक, दुपारी ३.३० वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.मधाचे गाव असलेल्या मांघर गावाला ते दि. २४ रोजी दुपारी २.३० वाजता भेट देऊन पाहणी करार आहेत. दुपारी ३.१० वाजता राजभवनाकडे मोटारीने प्रयाण करतील. दि.२५ रोजी दुपारी १२ वाजता राजभवन येथून मोटारीने पाचगणीकडे प्रयाण, १२.३० न्यू ईरा हायस्कूल पाचगणी येथे आगमन व हेलीकॉप्टरने राजभवन मुंबईकडे प्रयाण करतील.
राज्यपाल रमेश बैस आजपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:56 AM