नागपूर : प्रस्तावित कराड-चिपळूण रेल्वे मार्ग हा मराठवाड्याला थेट कोकणशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे; परंतु सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे. या प्रकल्पाची काहीच प्रगती दिसून येत नाही. तेव्हा बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत केला.या प्रकल्पासंबंधी लक्षवेधी सूचनेद्वारा पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, कराड-चिपळून रेल्वे प्रकल्पाचे २०१६ साली भूमिपूजन झाले; परंतु तेव्हापासून या प्रकल्पाचे काय झाले ते कळायला मार्ग नाही. राज्यातील हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे.यावर सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना सांगितले की, बुलेटट्रेनशी याचा काही संबंध नाही. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल.
बुलेट ट्रेनसाठी कराड-चिपळूण रेल्वेमार्ग थंडबस्त्यात टाकला का?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 1:27 PM