नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी त्यांच्या आई दिवंगत सिंधुताई सुकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविला. ग्रामपंचायत कर्मचारी नितीन आंबेकर, दीपक पाटील, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, धैर्यशील पाटील या कर्मचाऱ्यांना कीट देण्यात आले. त्यामध्ये उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी डोक्यात घालायला टोपी, मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर, आदींचा समावेश आहे.
प्रशांत सुकरे म्हणाले, कोरोनाचे महामारी संकट आज खूप मोठे आहे. या काळातही नांदगाव येथे ग्रामपंचायत कर्मचारी जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी काम करताना खबरदारी घेऊन करावे, या भावना मी व्यक्त केल्या आहेत; पण माझीही जबाबदारी म्हणून मी त्यांना कोविड कीट देऊ केले आहे. यापुढेही कर्मचाऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
यावेळी जयवंत मोहिते, सतीश कडोले, हितेश सुर्वे, अनिकेत माळी, रघुनाथ जाधव, गणेश पाटील, मच्छिंद्र कुंभार, संजय पाटील, राहुल माटेकर, अनिल पाटील, आदींची उपस्थिती होती.
चौकट
दरम्यान, गाव कामगार तलाठी कार्यालयात काम करणारे केशव कुंभार व नांदगाव हायस्कूलमध्ये काम करणारे कर्मचारी अनिल गोसावी व गजानन मिठारे यांनाही कोविड कीट देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.