पोपट माने ।लोकमत न्यूज नेटवर्कतळमावले : जन्म झाल्यापासून दोन्ही डोळ्यांना दिसत नसताना देखील निगडे, ता. पाटण येथील २८ वर्षीय युवक भरत कदम किराणा मालाचे दुकान व्यवस्थितपणे चालवत आहे. ग्राहकांनी दिलेले पैसे नोटा, नानी हाताच्या स्पर्शाने बरोबर ओळखत आहे.पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात ढेबेवाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या निगडे या गावातील भरत कदम या युवकाला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. त्याने अनेक ठिकाणी डोळ्यावर उपचार केले. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. जन्मापासूनच त्यांची डोळ्यांना रक्तपुरवठा होत नसल्याने त्याला दिसत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही म्हणून भरत खचलेला नाही. त्याने मनाशी जिद्द बाळगत आपल्या अंधत्वावर मात केली. त्याने किराणा मालाचे दुकान टाकले. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हवा असलेल्या वस्तू तो अगदी न चुकता देतोय. तर ग्राहकांनी मालाचे पैसे, नोटा या बरोबर ओळखतो.आज समाजात दृष्टिहीन युवक तसेच युवतींसाठी भरत कदम हा युवक आदर्शस्थानी मानावा लागेल. दृष्टी नसतानाही जिद्द, चिकाटीच्या जोरावर भरतने आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या या निर्णयात त्यांच्या घरच्यांनीही देखील सहकार्य केले आहे.आज भरत कदम याला नवीदृष्टी मिळणे गरजेची आहे. त्यासाठी एखाद्या सामाजिक संस्था, व्यक्तीकडून पुढील उपचारासाठी मदत मिळाल्यास त्यास नवी दृष्टी मिळेल.हे नक्की !नोटांची ओळख स्पर्शातूनढेबेवाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर डोंगर भागात वसलेल्या निगडे येथील भरत कदम हा दृष्टी नसतानाही केवळ हाताच्या स्पर्शाने ग्राहकांकडून दिल्या जाणाºया नोटा अगदी अचूक ओळखत आहे. हाताच्या स्पर्शाने नोटा तसेच सुट्टे पैसे ओळखून ग्राहकांना ता परत देत आहे.
दृष्टिहीन भरत चालवतोय किराणामाल दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:03 PM