सातारा : बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. कोविडचा प्रादुर्भाव सुरू असताना, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात जवळपास सर्वच जागा भरल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत बंदच असून, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीत आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसादही थंडावला आहे. अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झाले नसल्याने, आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. आता ती वाढवून २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- चौकट
शाळांचे पैसे सरकार कधी देणार?
शासनाकडून आरटीईअंतर्गत परतावा वेळेवर मिळत नाही. परताव्याची रक्कम १७ हजार ६७० वरून कमी करून, ती ८ हजार करण्यात आलेली नाही. तीही प्रवेशित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या प्रमाणानुसार ठरविली जाणार आहे. शाळांचे पैसे कधी देणार, असा प्रश्न संस्था चालकांनी उपस्थित केला आहे.
- चौकट
पालकांच्या अडचणी काय...?
या वर्षी आरटीईला माझ्या मुलांचा नंबर लागला आहे. मात्र, आम्हाला ज्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे होता, त्या शाळेत नंबर लागला नाही. त्यामुळे आमचा हिरमोड झाला आहे.
- अश्विनी पवार, पालक
- कोट
कोविडमुळे शाळा कधी सुरू होणार, हे अनिश्चित आहे. इतर शाळांनी अध्यापन सुरू केले असून, यांची प्रवेश प्रक्रियाच सुरू आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यास थोडा विलंब झाला.
- अल्ताफ मुजावर, पालक
- चौकट
दुसऱ्यांदा मुदतवाढ
आरटीई प्रवेश निश्चितीची प्रक्रिया ११ जूनपासून राज्यभर सगळीकडे सुरू झाली. त्यासाठी प्रारंभी २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, त्यात पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली होती, तरीही प्रवेश पूर्ण न झाल्याने आता २३ जुलैपर्यंत पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
- पॉइंटर
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद
एकुण जागा :
झालेले प्रवेश :
शिल्लक जागा :
तालुकानिहाय शाळा आणि जागा :
- चौकट
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात अत्यंत पारदर्शक पद्धतीने कामकाज झाले आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही आरटीई प्रवेश झालेआहेत. यात प्रवेश कमी झाल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात पाहायला मिळाले नाही.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी