शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

ग्रीन टाकेवाडीसाठी आता ‘घरेही हिरवी’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:52 PM

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळी माणदेशातील टाकेवाडी गावाने वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामानंतर गाव हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे. त्यातूनच घरांना हिरवा रंग देण्याचे काम सुरू आहे. तसेच गावातील रस्ते, परिसर, डोंगरात पाच हजारांहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गावातील एका व्यक्तीस दोन झाडे देण्यात येणार आहेत. ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळी माणदेशातील टाकेवाडी गावाने वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामानंतर गाव हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे. त्यातूनच घरांना हिरवा रंग देण्याचे काम सुरू आहे. तसेच गावातील रस्ते, परिसर, डोंगरात पाच हजारांहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गावातील एका व्यक्तीस दोन झाडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच दुष्काळी टाकेवाडी ‘ग्रीन माण’साठी एक आदर्श ठरणार आहे.माण तालुक्यातील टाकेवाडी. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर. तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेलं हे गाव तसं दुर्गम. गावातील बहुतांशी कुटुंबाचा व्यवसाय हा मेंढपाळचा. तर अनेक घरातील तरुण नोकरीनिमित्त पुण्या, मुंबईला. या गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायचं. त्यामुळे ग्रामस्थांनी ठरविले आता पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचं. टाकेवाडी गावाने यावर्षीच वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आणि गाव बदललं. आता गाव हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे.टाकेवाडीने आता गाव हिरवागार करण्याचा पूर्ण निश्चय केला आहे. त्यासाठी चार हजार झाडांची नर्सरी तयार केली आहे. तर दोन हजार झाडे लावण्यात आली असून, आणखी चार हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे प्रथम गावातील रस्त्याच्या बाजूने व बोळातून लावण्यात येणार आहेत. त्यानंतर परिसरातील मोकळ्या जागेवर ही झाडे लावली जाणार आहेत. विशेष म्हणजे या गावातील प्रत्येक व्यक्तीस दोन झाडे देण्यात येणार आहेत. त्या व्यक्तीने हे झाड लावून जगवायचं आहे. झाडांची काळजी घेऊन वेळच्यावेळी पाणी देणे, संरक्षण करायचे आहे.लोकवर्गणीतून काम सुरू...या गावाचे आणखी एक वैशिष्ट ठरले आहे ते म्हणजे गाव हिरवागार करण्याबरोबरच घरेही हिरवीगार करण्यात येत आहेत. सर्वच घरांना हिरवा रंग देण्याचे काम सुरू झाले आहे. लोकवर्गणीतून घरांना रंग देण्यात येत आहे. त्यामुळे गावात एक प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणाच्याही मदतीशिवाय हे काम सुरू आहे. गावाचे हे पाऊल इतरांसाठी एक आदर्श ठरणार आहे.चिंच, आंबा, जांभूळ, करंज झाडे लावणारसीसीटीत जंगली झाडांच्या बिया टाकणार