लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : दिवसभर उन्हातान्हात राबून ऊस तोडणाºया मजुरांच्या तळावर आता हिरवीगार सावली निर्माण करण्याच्या नवा प्रयोग किसन वीर साखर कारखान्याने केला आहे.‘सर्वसामान्य शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली येथील व्यवस्थापनाने नवनवीन प्रकल्प उभारणीबरोबरच निसर्ग संवर्धनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेतली आहे. हा उपक्रम स्तुत्य व अभिनंदनीय आहे,’ असे प्रतिपादन सिमेन्स इंडिया कंपनीचे एक्झिकेटीव्ह इंजिनिअर महावीर सिंग चव्हाण यांनी केले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावरील मजूर तळ परिसरात राज्यवृक्ष असलेला तामण जातीच्या ६६ झाडांची लागवड ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाच्या गजरात चव्हाण यांच्या हस्ते आणि कारखान्याचे खातेप्रमुख व विभागप्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यवस्थापनाने ऊस तोड मजुरांच्या खोपीतळातील सुमारे १५ एकर परिसरात आतापर्यंत तामण १८७, गुळभेंडी ५५, अर्जुन ८५, पिंपळ ३०, करंज २०, कडुलिंब २० अशी एकूण ३९७ झाडे लावलेली आहेत.चव्हाण म्हणाले, ‘आज औद्योगिकीकरणामुळे हवेत कार्बनडाय आॅक्साईचे प्रमाण वाढलेले आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे वृक्षतोड अमाप होत आहे. ’यावेळी इन्चार्ज सेक्रेटरी एन. एन. काळोखे, चीफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, प्रोडॅक्शन मॅनेजर ए. एस. साळुंखे, इन्चार्ज अॅग्री मॅनेंजर विठ्ठलराव कदम, डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद, एचआर मॅनेंजर ए. टी. शिंगटे, को-जन मॅनेजर डी. आर. वाघोले, सुरक्षा अधिकारी एस. एम. बर्गे, सिव्हिल इंजिनियर एच. एस. पाटील, परचेस इन्चार्ज राजेंद्र भीमराव भोईटे, जनसंपर्क अधिकारी मेहबूब मदारखान, इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, इन्चार्ज शुगर गोदाम किपर दीपक गाढवे, हेवी व्हेईकल इन्चार्ज राजेंद्र भोईटे, इन्चार्ज स्टोअर किपर आर. एम. मतकर, फलोत्पादन विभाग प्रमुख विशाल सावंत, कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.
ऊस तोड मजुरांच्या तळावर ‘हिरवीगार सावली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:49 AM