खटाव : बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती खटावमध्ये साजरी करण्यात आली.
खटावमधील अण्णा भाऊ साठे नगर व चौकात आण्णा भाऊ साठे स्तंभ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करत त्यांच्या प्रतिमेस आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, प्रतीक विधाते, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सकटे, राहुल जमदाडे, विकास कुंभार, लहुजी ग्रुपचे अध्यक्ष संतोष वायदंडे, अशोक कुदळे, राजेंद्र करळे, रवींद्र सकटे, महेश वायदंडे, सागर वायदंडे, रोहित वायदंडे, ओकार वायदंडे, गणेश वायदंडे, सुनील वायदंडे, नितीन सावंत, अभिजित वायदंडे, अमोल वायदंडे यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
अण्णा भाऊ साठे मंडळ व लहुजी ग्रुपच्यावतीने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
०१खटाव अण्णा भाऊ साठे
कॅप्शन : खटावमध्ये अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार महेश शिंदे, राहुल पाटील, प्रतीक विधाते, सरपंच नंदकुमार वायदंडे आदी उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)