शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

सायकल रॅलीतून शहिदांना अभिवादन

By admin | Published: December 19, 2014 9:17 PM

वाई फेस्टिव्हल : जागतिक सायकलस्वारासह शेकडो तरुणाईचा सहभाग

वाई : येथे वाई फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल रॅलीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, छान थंडी होती. त्या थंडीची पर्वा न करता मोठ्या संख्येने मुले-मुली सायकलरॅलीत सहभागी झाली. ‘भारत माता की जय’ या घोषणेने आसमंत भारावून गेला. सायकलरॅलीद्वारे शहिदांना अभिवादन करण्यात आले. देशभक्तिपर गाणी सायकलरॅलीची शोभा वाढवून, वातावरण देशप्रेमाने रोमांचित करत होती. सायकलरॅलीच्या अग्रभागी उघड्या जीपमध्ये भारतमाता होती. भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची पर्वा न करणारा जवान, हे दृश्य खरोखरीच ह्दयाला साद घालणारे होते. गणपती घाटावरून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण वाई शहरातून प्रदक्षिणा घालून गणपती घाटावर समारोप करण्यात आला.सायकलरॅलीचे उद्घाटन रोटरी अध्यक्षा सोनाली शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. फेस्टिव्हलचे निमंत्रक आनंद कोल्हापुरे, सचिव डॉ. नितीन कदम व प्रमोद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. वाई रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दादा लोळे व मदनकुमार सावळेकर यांनीही सायकलरॅली पूर्ण केली. जागतिक सायकलवीर वाईचा विक्रमवीर प्रसाद एरंड तसेच राष्ट्रीय कराटे खेळाडू वैष्णवी पिसाळ यांच्यासह विद्यार्थ्यांचा या रॅलीत सहभाग होता. रोटेरीयन मदन पोरे, राजेंद्र धुमाळ, डॉ. नीलिमा भोसले, डॉ. जयश्री जगताप, नगरसेविका अनुराधा कोल्हापुरे, विजय पोरे, परामर अभ्यंकर, सचिन येवले, बाबू देशमुख, राजे गुरव, संतोश चव्हाण, सुनील शिंदे, प्रशांत सोनावणे, योगेश दाहोत्रे, मिलिंंद अष्टपुत्रे, गणेश लाड, चेतन गोरे, महादेव भगत, विशाल गुजर, संगीता सोनावणे आदी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)आज ‘देश मेरा रंगिला’वाई फेस्टिव्हलचे उद्घाटन शनिवार, दि. २० सायंकाळी साडेसहाला महागणपती घाटावर होणार आहे. यावेळी ‘देश मेरा रंगीला’ हा नृत्य संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.