कुकुडवाड : देवापूर (ता. माण) येथे आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची २३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन जालना जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक अधिकारी नानासाहेब चव्हाण, सरपंच शहाजी बाबर, उपसरपंच मंगल चव्हाण यांच्याहस्ते करून अभिवादन करण्यात आले.
नानासाहेब चव्हाण म्हणाले, हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत . काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या. १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारा व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला तो म्हणजे उमाजी नाईक'.
त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. उमाजी नाईक यांच्यासमोर छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अन्यायापासून संरक्षण होण्यासाठी सतत इंग्रजांबरोबर लढत राहिले. नरवीर उमाजीराजेंचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवावा.
यावेळी तात्यासाहेब औताडे, बाबासाहेब बनसोडे, काकासाहेब जाधव, नीलेश बनसोडे, विशाल जाधव, सुहास चव्हाण, नितीन चव्हाण, रणजित जाधव, अरुण सावंत, संदीप चव्हाण, समर्थ जाधव, जीवा जाधव, मलेश जाधव, शहाजी बनसोडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
080921\img_20210907_122304.jpg
देवापुर येथे नरवीर उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन