सातारा : शंभरपैकी जवळजवळ नव्वद खातेदारांचे म्हणणे असते की, विकास करा, रस्ता चांगला बांधा.. पण त्याचे चांगले पैसे आणि लवकर द्या, मात्र प्रशासनाच्या लालफिती कारभारामुळे लोकांपर्यंत हे पैसे पोहोचण्यास तसेच लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास विलंब होत असल्यामुळे सहापरदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे.ज्यांची जमीन सहापदीकरणामध्ये गेली आहे, अशा लोकांना जमिनीचा मोबदला देताना प्रत्येकाचा रेडीरेकनर त्या त्या गावाचा ठरलेला असतो. समजा एखाद्याचे शेत बिनशेती असेल तर त्याप्रमाणे त्याला पैसे दिले जातात. तर शेतीचे असेल तर शेतीप्रमाणे पैसे दिले जातात.नॅशनल हायवे अॅक्ट १९५६ नुसार पहिल्यांदा जर एखाद्या जमिनीमध्ये सर्व्हे करायचा असेल तर ३ सी प्रकाशित करावे लागते. त्याचे राजपत्र होतं. दिल्लीमधून आणि ते ३ सी प्रकाशित झाल्यानंतर मगच सर्व्हेसाठी परवागनी मिळते. हा सर्व्हे करताना कोणालाही बेकायदेशीररीत्या अडथळा करता येत नाही. म्हणजे एखादा म्हणू शकतो, माझ्या शेतात येऊन का मोजणी करताय, पण वास्तविक एका विभागाची मोजणी करायची असेल तर संपूर्ण गट मोजावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याचे काहीच चालत नाही. प्रशासन दर ठरवेल तो दर घेऊन निमूटपणे स्वत:ची जमीन शासनाच्या स्वाधीन करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरत नसतो. पूर्वी महामार्गाचा विकास करताना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. परंतु ३ सी प्रकाशित केल्यामुळे शेतकऱ्याला अडथळा निर्माण करता येत नाही. त्यामुळे सध्या सहापदरीकरणाचे काम सोपे झाले असले तरी शेतकऱ्यांची मते जाणून घेऊनच काम पूर्णत्वास नेण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)झाडे तोडण्यासाठी दोन कोटी!सहापदरीकरणाचे काम रखडण्यामागे वनविभाग कारणीभूत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणे वनविभागाकडे तब्बल दोन कोटी रुपये भरले आहेत. असे असताना अद्याप वनविभागकडून कसलीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवून घेतल्याशिवाय प्रशासनापुढे गत्यंतर नाही.‘शिवराज’ उड्डाणपुलाचे काम आठ दिवसांत मार्गी लावणारमहामार्ग अधिकाऱ्यांचे शिंदे यांना आश्वासनसातारा : संभाजीनगर ग्रामस्थ व हायवे शेजारच्या सर्व नागरिकांच्या संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या ‘शिवराज भुयारी मार्ग’चा विषय लवकर मार्गी लागणार असून, येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याच्या सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तांत्रिक अडचणींमुळे व काही प्रशासकीय आदेश यामुळे येथील हा विषय लांबणीवर पडला होता; पण सर्व तांत्रिक बाबी आता पूर्ण झाल्या असून, लवकर हे काम सुरू होणार आहे.या संदर्भात येथील नागरिकांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना सर्व माहिती दिली. येथे घडणारे अपघात, वाहतूक गर्दी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ व नागरिक यांना करावे लागणारे क्रॉसिंग हे सर्व विषय महत्त्वाचे आहेत. हायवे अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत काम सुरू होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे संभाजीनगर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भुयारी मार्गाच्या कामासाठी प्रशासकीय पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांना निवेदन दिले.यावेळी प्रवीण शिंगटे, जगदीश महाजन, विद्याधर थोरात, सुजीत चावरे, सागर तरडे, अक्षयकुमार पाटील, हर्षल जगदाळे, सत्यजित चावरे, पै. संतोष बाबर, बापू पाटील, संजय क्षीरसागर, नीलेश कुलकर्णी, गोरख नलावडे, मल्लकमीर काका, ग्रामपंचायत सदस्य, अनिल खराडे, डॉ. पोळ, राजन भिंताडे व संभाजीनगरमधील ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विकास करा... पण वेळेत मोबदला द्या !
By admin | Published: June 29, 2015 10:50 PM