भोलेनाथ केवटे ।सातारा : मोबाईल फोन ही आजच्या काळात सर्वांचीच गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात एक नव्हे तर दोन-दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातही स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली असली तरी नागरिक आजही स्मार्टफोनची योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब भयानक असून, स्मार्टफोनच्या वापरात केलेला निष्काळजीपणा धोकायदायक ठरू शकतो.
पूर्वीच्या काळी घरात एखादा टेलिफोन असायचा. त्याच्यावरच संभाषण चालायचं. काही कालावधीनंतर मोबाईल आला. परंतु त्याचा वापर फक्त फोन उचलणे आणि कट करणे यासाठीच होत होता. कालांतराने मोबाईलमध्ये नवनवीन फिचर्स येऊ लागले. त्यात इंटरनेट, कॅमेरा, गेम्स, व्हिडीओज आदी फिचर्स उपलब्ध झाले. मात्र, नागरिक या स्मार्टफोनचा निष्काळजीपणे वापर करीत असल्याने या निष्काळजीपणामुळेच मोबाईलचा स्फोट होण्यासारख्या घटना घडत आहेत.परभणी येथील एक युवक मोबाईल चार्जिंगला लावून बोलत होता, त्यावेळी स्फोट होऊन त्याच्या हाताची तीन बोटे निकामी झाली होती.
तसेच दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे खिशात मोबाईलचा स्फोट होऊन एकजण जखमी झाला होता. लखनौमध्येही मोबाईलचा स्फोट होऊन एकजणाचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत नसल्या तरी स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी मोबाईलचा ‘स्मार्ट’ वापरही करायला हवा. असे केल्यास संभाव्य धोका टळण्यास मदत होऊ शकते, असे मत व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चार्जिंग लावल्यावर ‘नो यूज’मोबाईलची बॅटरी ही लिथियम आयर्नपासून बनलेली असते. जी चार्जिंगच्या वेळी गरम होते. मोबाईल चार्जिंग लावल्यावर जर फोनचा वापर होत असेल तर ती आणखीन जास्त गरम होते. त्यामुळे मोबाईल फुटण्याचा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे चार्जिंग लावल्यावर मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे.अशी घ्याल काळजीआपला फोन सतत चार्जिंग करू नकाफोन रात्री चार्जिंगला लावून झोपू नयेमोबाईल चार्ज करताना फोनवर बोलणे, गेम खेळणे, इंटरनेटचा वापर करणे टाळावेफोनवर कोणताही बाह्य दबाव पडणार नाही, याची काळजी घेणेकोणत्याही कारणाने बॅटरी खराब झाल्यास त्याच कंपनीच्या बॅटरीची निवड करादुसºया कोणत्याही कंपनीची बॅटरी घेण्याचा मोह टाळावा.पेट्रोल पंपाजवळ मोबाईलचा वापर टाळावा