शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात जोर'धार', धरणसाठ्यात वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:35 PM

साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणीपातळी वाढून २६.५५ टीमएसी इतकी झाली आहे. तर पावसामुळे सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील धरण परिसरात जोरधार, धरणसाठ्यात वाढ कोयनेत ७३१३ क्युसेक पाण्याची आवकसज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणीपातळी वाढून २६.५५ टीमएसी इतकी झाली आहे. तर पावसामुळे सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली.यावर्षी जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली. मात्र, काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली होती. असे असतानाच गेल्या चार दिवसांपासून पाऊस जोर धरु लागला आहे. तर सोमवारपासून पश्चिम भागात संततधार सुरू आहे.

महाबळेश्वर, बामणोली, कास, कोयनानगर, नवजा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होऊ लागली आहे. कोयनानगर येथे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १८३ मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर पाणीपातळी २६.५५ टीमएमसी इतकी झाली आहे.

धोम धरण परिसरात ३२ मिलीमीटर पाऊस होऊन २९४ क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. कण्हेर येथे ३२, उरमोडी ४५ तर तारळी धरणक्षेत्रात ९९ मिलीमीटर पाऊस झाला.

सध्या धोम, बलकवडी, उरमोडी, तारळीसह प्रमुख धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी अधूनमधन पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार सरीही पडल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.धोकादायक वाहतूक...सातारा शहराच्या पश्चिमेकडील भागात संततधार सुरू असून त्यामुळे सोमवारी रात्रीच्या सुमारास सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली. परिणामी या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प झाली होती. तर लहान वाहनांची वाहतूक धोका पत्करुन सुरू होती.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ३५ (१२९)कोयना १८३ (६४४)बलकवडी ९६ (३१२)कण्हेर ३२ (९४)उरमोडी ४५ (१०९)तारळी ९९ (२४७) 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरDamधरण