आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0३ : जीएसटीमुळे बाजारपेठेतील वातावरण तंग असतानाच आलेल्या आषाढी एकादशीला अच्छे दिन आलेत असे म्हणावे लागेल. स्थानिक उत्पादनांवर जीएसटीत सवलत मिळाल्यामुळे यंदा ह्यएकादशी ... दुप्पट खाशी हे चित्र सर्वत्र दिसेल असा व्यापाऱ्यांचा कयास आहे.शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा केली. व्यापारी, ग्राहक, किमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे.
साताऱ्यातील बाजारपेठेनेही जीएसटीह्चे स्वागत केले. साताऱ्याची अंतरराष्ट्रीय पातळीवर अनोखी ओळख करून देणारा कंदी पेढ्याला जीएसटी कर प्रणालीत वाढायला वाव आहे. कंदी पेढ्यावर पुर्वी १२ टक्के व्हॅट होता, आता ५ टक्के जीएसटी लागु होणार आहे. जिल्ह्यात दहा साखर कारखाने आहेत. साखरेवर पूर्वी २६ टक्के व्हॅट होता. नियमीत साखरेवर आता ५ टक्के जीएसटी आहे, तर रिफार्इंड साखरेवर १८ टक्के जीएसटी असणार आहे. त्यामुळे साखर उत्पादकांबरोबरचं आता खरेदीदारांनाही याचा लाभ होणार असल्याचे दृष्टिक्षेपात आहे. यंदाच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील बहुतांश उपवासाच्या पदार्थांचे दर स्थिर आहेत. त्यामुळे बाजारपेठेत अच्छे दिन दिसणार आहेत.
स्थानिक डेअरीला सुवर्णकाळ
शहरात अस्तित्वात असलेल्या स्थानिक डेअरीला जीएसटीमुळे सुवर्णकाळ येणार आहे. ब्रॅण्डेड पनीर खरेदीवर ६ टक्के व्हॅट होता आता १२ टक्के जीएसटी झाले आहे. स्थानिक डेअरीला केवळ ५ टक्के जीएसटी लागु होणार असल्याने त्यांच्या व्यवसायाला सुवर्णकाळ येणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.