सागर गुजर।सातारा : ग्रामीण भागात शेतकरी कष्टाने पीक काढतात. शेतात अनेक प्रयोगही केले जातात. हे प्रयोग यशस्वी होत असताना बाजार समितीच्या माध्यमातून त्यांना पाठबळ दिले गेले तर शेतकरी अधिक जोमाने काम करतील. सातारा बाजार समितीने अनेक उपक्रम राबवून शेतकºयांच्या हिताचे काम हाती घेतलेले आहे. शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे इतर बाजार समित्यांसाठी हे काम आदर्शवत ठरले आहे.
प्रश्न : शेतकºयांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी काय निर्णय घेतले?उत्तर : शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळावा, यासाठी सर्व व्यापाºयांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच बाजारपेठेची माहिती मिळावी, यासाठी शेतकºयांच्या मोबाईलवर बाजारभाव पाठविले जातात. गुरुवार व रविवारी तब्बल ८०० शेतकºयांना बाजारभावाची माहिती मोबाईलवर पाठविली जाते.
प्रश्न : शेतकºयांच्या मुलांसाठी अभ्यासिकेला कसे मूर्तरूप दिले?उत्तर : सातारा तालुक्याच्या डोंगरदºयांतील गावांमधून शेकडो मुले शिक्षण घेण्यासाठी साताºयातील महाविद्यालयांमध्ये येतात. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीही विविध ठिकाणी अभ्यासिकेत जातात. या मुलांना जर मोफत अभ्यासिका उपलब्ध केली तर शेतकºयांचा आर्थिक ताण कमी होईल, या हेतूने बाजार समितीच्या आवारात मोफत अभ्यासिका उभारण्यात आली.
प्रश्न : शेतकरी मंडईतील चिखलाचे साम्राज्य कसे दूर केले?उत्तर : बाजार समितीच्या आवारात शेतीमाल विक्रीसाठी शेतकºयांना जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. पावसाळ्यामध्ये या आवारात चिखलाचे साम्राज्य साठायचे. बाजार समितीने या जागेत साडेआठ लाख रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक टाकले. यामुळे चिखलाचे साम्राज्य दूर झाले.
प्रश्न : पाच रुपयांत जेवणाचा उपक्रम काय आहे?उत्तर : शेतकरी सकाळी शेतमाल घेऊन यतात. त्यामुळे बाजार समितीतर्फे शेतकºयांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. बाजार समिती व आडत व्यापाºयांनी यासाठी योगदान दिले आहे.
- अभ्यासिकेचा प्रयोग यशस्वी
खेडोपाड्यातून असंख्य युवक-युवती महाविद्यालयीन शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सातारा शहरात येत असतात. सातारा व जावळी तालुक्यांचा बहुतांश भाग हा डोंगरी आहे. सकाळी ६ वाजता एखादी एसटी बस सातारा शहरात आली तर संध्याकाळीच दुसरी बस मिळते. त्यामुळे मधल्या काळात मुले पैसे देऊन अभ्यासिकेत बसतात. या मुलांचे पैसे वाया जात होते. बाजार समितीतर्फे या मुलांसाठी मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली. त्या अभ्यासिकेला यशही आले. या अभ्यासिकेत अभ्यास केलेले तरुण-तरुणी नोकरीला लागले. साकेवाडी, जकातवाडी या गावांतील एकूण ४ बेरोजगारांना पोलीस खात्यात नोकरी मिळाली.
- अन् शेतक-यांच्या चो-या थांबवल्या
पोवई नाका ते सुभाषचंद्र चौक या रस्त्यावर पहाटे ४ पासून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. या भागात टॉयलेट उपलब्ध नाही. त्यामुळे शेतमाल रस्त्यावर सोडून शेतकरी टॉयलेटकडे जात होते. मात्र शेतकरी शेतमाल चोरून नेत असत. बाजार समितीने बीओटी तत्त्वावर टॉयलेट उभारले. शेतकºयांना ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.