कऱ्हाड तालुक्यातील शामगाव हे गाव पूर्वीपासून दुष्काळी आहे. येथील सर्व शेती पावसावर अवलंबून आहे. येथे खरीप हंगाम कसाबसा घेतला जातो, तर रब्बी हंगाम शाश्वत नाही. इतर कालावधीत शेती पडून असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसाबसा चालला आहे. येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गत दोन वर्षांपासून पाण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्यासाठीचा पाठपुरावाही सुरू आहे. या प्रश्नासंदर्भातच शामगावच्या सुमारे शंभर शेतकऱ्यांनी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आपण टेंभू योजनेतुन शामगावचा पाणीप्रश्न सोडविणार असल्याची सकारात्मक भूमिका दाखवून मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
यावेळी शिवाजी पाटील, भीमराव डांगे, शंकर पोळ, बंडा पोळ, प्रकाश लावंड, दिलीप पोळ, विश्वास पोळ, प्रदीप पोळ, सुनील गायकवाड, बापुराव पोळ, रवी पोळ, राहुल यादव, बाजीराव मोहिते, सुरेश चव्हाण, अधिकराव पोळ, सुनील पोळ, महेश पोळ, बाबूराव पोळ, आदी शेतकरी उपस्थित होते.
फोटो : १३केआरडी०२
कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथील पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.