सातारा : येथील जिल्हा परिषद ते विसावा नाका परिसरातील मागील काही वर्षांपासून हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण सांगून पालिकेने अतिक्रमण काढले. यावेळी सर्व गाडेधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले होते. परंतु, आज अखेर यांचे पुनर्वसन झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सातारा-कोरेगाव हा रस्ता चौपदीकरण करण्याची मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यात आली होती. यामध्ये फळ, वडापाव, चायनीज आदी हातगाडेधारकांचा समावेश आहे. त्यावेळी त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु पुनर्वसन न झाल्याने मिळेल त्या जागी हातगाड्या टाकून व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवला. त्यापैकी बहुतांशी व्यावसायिक जिल्हा परिषदेच्या चौकाला पसंती दिली. याठिकाणी शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडापाव, ज्यूस, फ्रुट विक्रेते, चायनिज अन्य हातगाड्यांचे अतिक्रमण होत गेले. अनेकांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी मागणीही केली होती. परंतु व्यावसायिकांच्या एकीने पर्याय जागा देणाऱ्याचा आग्रह धरला. पालकमंत्र्यांचा दौरा असून, चौकातील अतिक्रमण काही दिवसांसाठी काढा असे सांगून या चौकातील सर्व विक्रेते अतिक्रमण पालिकेने काढले आहे. सतत व्यवसायाची जागा बदलत असल्याने व्यावसायिकांना नुकसान होत आहे. पालिकेने पर्यायी जागा घ्यावा किंवा आम्हा सर्वांत पुनर्वसन करा. अशी मागणी आता येथील व्यावसायिकांतून होत आहे. अतिक्रमण काढल्याने अनेक मागण्या येथील फुटपाथवर अस्ताव्यस्त पडल्या असून, आज ना उद्या जागा मिळेल या अपेक्षेने व्यावसायिक हातगाड्यावरच बसून वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)व्यावसायिकांना पर्यायी जागा हवीय...सातारा-कोरेगाव रस्त्यावर पालिकेने आरक्षित केलेल्या काही जागा आहेत. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली आहेत. पालिकेने या जागा स्वच्छ करून रस्त्यावरील हातगाडीधारकांचे पुर्नवसन येथे केले तर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही आणि ग्राहकांनाही एकाच ठिकाणी सर्व मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोजच्या दडपणाला आता कंटाळलोय!हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना कायमची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. ‘रोजच्या या दडपणाला आता आम्ही कंटाळलोय, काहीही करा आणि आम्हाला एकच सुरक्षित जागा द्या’ अशी आर्जव या व्यावसायिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
‘पालक’मंत्र्यासाठी म्हणे हातगाडेधारक ‘बेवारस’
By admin | Published: December 15, 2015 9:40 PM