शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दुर्गम भागातील पक्क्या घरांसमोर उभारणार गुढी !

By admin | Published: March 22, 2017 10:54 PM

प्रधान मंत्री आवास : राजेश देशमुख यांच्या सहिष्णुतेने मुनावळे ग्रामस्थ भारावले; चार कुटुंबे हक्काच्या घरात

सातारा : रविवार दिवस तसा सुटीचा ! वेळ सकाळी नऊची. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह दोन तासांच्या प्रवासानंतर मुनावळे गाठले. तेथून बोटीने प्रवास करत तासा दीड तासात अत्यंत प्रतिकूल आणि दुर्गम असणाऱ्या कारगाव, आंबवडे गावी भेट दिली. निमित्त होतं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधून तयार असणाऱ्या घरकुलांच्या पाहणीचं ! जावळी तालुक्यातील प्रतिकूल, दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन योजनांची पाहणी करणारे डॉ. देशमुख कदाचित पहिलेच मुख्य कार्यकारी अधिकारी असावेत. वर्षानुवर्षे साध्या छपरात राहणारे लाभार्थी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या नव्या पक्क्या घरकुलात प्रवेश करणार, याचा आनंद लाभार्थ्यांपेक्षा डॉ. देशमुख यांच्या चेहऱ्यावर जास्त दिसून आला.प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासन राबवित आहे. जावळी तालुक्यातील कारगाव व आंबवडे या गावात चार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ही घरकुले अवघ्या अडीच महिन्यांत बांधून पूर्ण झाली आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला लाभार्थ्यांनी घरकुलासाठी लागणारे साहित्य बोटीतून आणून आपली वास्तू पूर्ण केली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. ‘गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी समन्वय ठेवून हीच कामे उत्तमरीत्या पार पाडली आहते. या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेसह, रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभाचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आज हसू पाहून मला खूप प्रसन्न वाटत आहे,’ अशा शब्दात डॉ. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शासनाच्या या विविध योजनांबाबत अधिकारी आणि लाभार्थी यांनी काही बोलक्या प्रतिक्रिया दिल्या.जिल्ह्यात ४ हजार ५०० घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आंबवडे व कारगाव या दुर्गम भागात घरकुले मंजूर केली आहेत. लाभार्थ्यांनी बोटीतून साहित्य आणून ३ महिन्यांच्या कालावधीत आपली घरे बांधली आहेत. येथे जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्याचा आमचा मानस आहे, असे जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)मी ४० वर्षांपासून जुन्या घरात राहत आहे. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मला चांगले घर मिळाले. यामध्ये आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १ लाख २० हजार, रोजगार हमी योजनेतून १७ हजार २८० रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२ हजार रुपये असे असे एकूण १ लाख ४९ हजार २८० रुपयांचा लाभ देण्यात आला. या घरामध्ये मी आणि माझी पत्नी सुखाने व आनंदाने राहत आहे. जुन्या घरात पावसाळ्यात मोठा त्रास होत होता. या नवीन घरामुळे आता सुरक्षा निर्माण झाली आहे. नवीन घरासमोर गुढीपाडव्या दिवशी गुढी उभी करणार आहे.- विठ्ठल झिमाजी कोकरे, लाभार्थी, कारगावमाझे जुने मोडलेले घर होते. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने तसेच गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या मदतीने माझे नवीन घर तयार झाले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेले पैसे आमच्या खात्यावर जमा झाले. घर बांधणीसाठी लागणारे साहित्य तापोळा, सातारा येथून बोटीने आणले व हे साहित्य डोक्यावरून वाहतूक करून घर बांधले.- सखाराम कोंडिबा चव्हाण, लाभार्थी, कारगावमाझे घर पूर्णपणे मोडकळीस आले होते. आम्हाला प्रधानमंत्री योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले असून, लाभाचे पैसे आमच्या खात्यावर जमा झाले आहेत. शासनाच्या योजनेमुळे मला घर बांधता आले.- धोंडिबा विठ्ठल माने, लाभार्थी, आंबवडे