केळघरला पाण्यासाठी मदत
सातारा : अतिवृष्टीमुळे केळघरची पिण्याच्या पाण्याची विहीर गाळाने भरल्याने व मोटार, पाईप वाहून गेल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून इनरव्हील क्लब सातारा कॅम्प यांच्यावतीने पाण्यासाठी आवश्यक साहित्य ग्रामपंचायतीकडे देण्यात आले. यावेळी गीता मामणिया, संगीता लोया, जयश्री पार्टे शेलार, श्रुती कुलकर्णी, सरपंच रवींद्र सल्लक, सुनील जांभळे, सचिन बिरामणे उपस्थित होते.
सातारा संघ तृतीय
सातारा : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. संघाचा कर्णधार किरण कुदळे, आकाश जाधव यांनी चमकदार कामगिरी केली. कर्णधार अभिजित काळे, राम चव्हाण, करण कदम, नारायण घोसपूरकर, रोहित गोडसे, दिशांत दवे, धीरज लाळगे, शुभम गवळी, संकेत बरकडे, प्रथमेश प्रसाद या खेळाडूंनी उत्तम खेळ केला.
डोंगरात पाणवठ्यांची गरज
सातारा : सातारालगतच्या डोंगरातील जंगलांमधून वन्यप्राणी भक्ष्य तसेच तहानेने व्याकुळ होत, सातारा शहरात येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी डोंगरांमध्ये नैसर्गिक पाणवठे तयार करावेत. उन्हाळ्याच्या दिवसात याच डोंगरांमध्ये वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पिंपरीत मार्गदर्शन
सातारा : पिंपरी (ता. कोरेगाव) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मराठा विद्द्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी कृषिकन्या मयुरी भोसले हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी उद्योग आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी (ता. कोरेगाव) येथील शेतकऱ्यांना, चारा निर्मिती कशी करावी, याचे मार्गदर्शन केले.