कऱ्हाड : बनवडी, ता. कऱ्हाड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शासकीय कृषी महाविद्यालयाची कृषी कन्या मृणाली मनोहर मिसाळ हिने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल, इंटरनेटचा वापर करत आधुनिक शेती कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले, तसेच मोबाईल ॲपद्वारे प्रात्यक्षिकही करून दाखवले. यावेळी शीतकक्षाचे फायदे व त्याची उभारणी याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बीज प्रक्रियेसह अन्य विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, डॉ. स्नेहल जुकटे, केंद्रप्रमुख डॉ. उल्हास बोरले, डॉ. धनंजय नावडकर, डॉ. आनंद चवई यांचे मार्गदर्शन लाभले.
पार्लेत पाणी योजना परिसरात वृक्षारोपण
कऱ्हाड : पार्ले, ता. कऱ्हाड येथे चोवीस तास पाणी योजना परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सदानंद भोपळे, राजकुमार आवळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पार्लेच्या सरपंच आश्विनी मदने, उपसरपंच मोहनराव पवार, माजी सरपंच व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सुभाष नलवडे, शिवाजी नलवडे, प्रकाश लोखंडे, विनोद नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ऑपरेटिंग रूमच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
कुशल मोहिते याचा बेलवडे बुद्रुकला सत्कार
कऱ्हाड : बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील कुशल मोहिते याने राष्ट्रीय ज्युनिअर ॲथलेटिक्स डेकथलॉन स्पर्धेमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला, तसेच त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे प्रशिक्षक पी. टी. पाटील यांचाही सत्कार झाला. यावेळी सरपंच डॉ. सुशांत मोहिते, डॉ. संपतराव मोहिते, सर्जेराव मोहिते, पै. संभाजी मोहिते, हंबीरराव मोहिते, गणेश साळुंखे, नितीन मोहिते, सुरेश मोहिते, गणेश मोहिते, जाफर पटेल, प्रवीण मोहिते, विराज मोहिते, मानसिंग मोहिते आदी उपस्थित होते.
साई सम्राट संस्थेकडून विविध रोपांचे वितरण
कऱ्हाड : साईसम्राट इन्स्टिट्यूटतर्फे विश्वस्त धैर्यशील पाटील यांच्या हस्ते रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी सम्राट पाटील, संचालक विलास झाडे, दिगंबर माळी, अवधूत पाटील, पंडित निकम, प्रा. संपत पाटील, प्रा. हणमंत काळे, ग्रामविकास अधिकारी बी. बी. पवार, तलाठी सचिन सावंत, राजेंद्र पाटील, विजय घोरपडे, सागर मोरे, राजू थोरात, जयवंत पाटील, संजय बनसोडे व तांबवे गावातील शेतकरी उपस्थित होते.