लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत व कुख्यात गुंड दत्ता उत्तम घाडगे (वय ३०) याला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सातारा प्रांताधिकाºयांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील दौलतनगरमधील शिवशंभो कॉलनीतील दत्ता घाडगे हा शाहुपूरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील कुख्यात गुंड आहे. तो वारंवार गुन्हे करण्यास सरसावला होता. त्याचा उपद्रव वाढत असल्याने शाहुपुरी पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांच्या मार्फत प्रांताधिकाºयांकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावावर सुनावणी होऊन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दत्ता घाडगे याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश काढला.
शाहुपूरी पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सुनावणी दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, गुंड दत्ता घाडगे याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, खंडणी, अपहरण, घरफोडी, धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करणे, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, धमकी, विनयभंग करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा प्रकारचे दखलपात्र ११ गुन्हे नोंद आहेत. तसेच त्याची भूविकास बँक चौक, दौलतनगर, करंजे भागात मोठी दहशत होती.
फोटो दि.३०दत्ता घाडगे गुन्हेगार फोटो...
.....................................................