आदर्की : फलटण तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूलचे १९९२ मधील दहावीचे चाळीस विद्यार्थी व शिक्षक तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र आले. या मुलांनी स्नेहमेळावा घेऊन विचारमंथन केले. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा, महात्मा फुले हायस्कूल यांना भेटवस्तू दिल्याने माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
सासवड (झणझणे) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये १९९२-९३ मधील दहावीचे विद्यार्थी, शिक्षकांनी एकत्र येऊन प्राथमिक शाळेच्या हॉलमध्ये प्रारंभी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी जीवनातील अनुभव व विद्यार्थी दशेतील अनुभव सांगितले. मुख्याध्यापक एम. बी. धुमाळ यांनी, जीवन प्रवासात शालेय ज्ञान जीवनात उपयोगास आणून एकमेकास साहाय्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी तत्कालीन शिक्षक एस. बी. थोरात, एस. व्ही. दर्शने, एच. जी. अनपट, एस. बी. कुमठेकर उपस्थित होते. कार्यक्रमास संजय भोईटे, अजय निगडे, राजकुमार अनपट, रवींद्र अनपट, अनिल मुळीक, अंजली जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.
यशवंत बांदल यांनी स्वागत केले. जयश्री सुतार यांनी सूत्रसंचालन केले. हरिचंद्र झणझणे यांनी आभार मानले.
फोटो ०२आदर्की-सासवड
सासवड येथील महात्मा फुले हायस्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक तब्बल सत्तावीस वर्षानंतर
एकत्र आले. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)