बेशिस्त पार्किंग (फोटो : ११इन्फो०२)
कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, विजय दिवस चौक तसेच बसस्थानक परिसरात पुन्हा बेशिस्त वाहनांचे पार्किंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे बोर्ड लावले असून, नो पार्किंग झोनही निश्चित केलेले आहेत. मात्र, तरीही अनेक वाहनधारक नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करून नियमाचे उल्लंघन करीत आहेत.
बांधकाम साहित्य रस्त्यात
कऱ्हाड : शहर व परिसरात ठिकठिकाणी नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यातच टाकले जात आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. वाहन चालकांना दुखापत होत आहे. बांधकाम साहित्य रस्त्यात टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संख्याशास्त्र कार्यशाळा
कऱ्हाड : विद्यानगरला गाडगे महाराज महाविद्यालयात संख्याशास्त्र विषयाची एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. महेश बराके व गजानन पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य पाटील होते. यावेळी प्रा. महेश बराके यांनी संख्याशास्त्र विभागातील नोकरीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. तर एस. के. पाटील यांनी संख्याशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले.
श्वानांचा उपद्रव
तांबवे : किरपे, सुपने, विजयनगर परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दुचाकी वाहनांवरून जाणाºया दुचाकीस्वारांवर रात्रीच्या वेळी मोकाट श्वानांकडून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे वाहने घसरून किरकोळ अपघात होत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.