शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

पिंपोडे बुद्रुक परिसरात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:38 AM

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने ...

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने काही क्षणात अक्षरशः परिसर गारामय झाला.

गेले काही दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. बुधवारी सकाळपासून अशी स्थिती असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेत शिवारात काम करणाऱ्यांची तारांबळ‌ उडाली. दरम्यान, परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची गरज असलेल्या ऊस, आले व तत्सम पिकांना फायदा झाला असला तरी काढणी अवस्थेत असलेल्या पिकांचे गारांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, कलिंगड, कांदा बीजोत्पादन व तरकारी पिकांचे नुकसान गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झाले. काढणी स्थितीत असलेले व व्यापाऱ्यांशी करार पद्धतीने व्रिक्री सुरू असलेल्या कलिंगड व कांदा बीजोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर‌ निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती व तत्सम कारणांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यातच परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची गरज आहे.

राजेंद्र धुमाळ, व्हा. चेअरमन, सोनके विकास सेवा सोसायटी

फोटो - गारांसह झालेल्या पावसामुळे कांदा बीजोत्पादनाचे मोठे नुकसान झाले.