शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

आधी धरण; मग अभयारण्य अन् आता

By admin | Published: September 13, 2015 9:13 PM

कुणीही यावे... गाव उठवून जावे! व्याघ्रप्रकल्प : लोकांच्या मानसिकतेच्या विचार करणार कोण? --...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे / अरुण पवार - कऱ्हाड/पाटण आधी कोयना धरण; मग अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प, यामुळे विस्थापनाचं भूतच जणू पाटण तालुक्याच्या मानगुटीवर बसले आहे. यापूर्वी सुमारे शंभर गावांचं विस्थापन झालंच आहे; पण आता आखणी ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने इथल्या लोकांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाची निर्मिती पाटण तालुक्यात झाली. त्यावेळी सुमारे ५० च्यावर गावांच्या जमिनी पाण्यात गेल्या. त्यांचे पुनर्वसन होताना मरणयातना सोसल्या. आजही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत नाहीत. त्यानंतर कोयना व चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली; आणखी ६० गावे विस्थापित झाली. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय, त्यामुळे कोअर अन् बफर झोन तयार होऊ लागलेत. त्यामुळे सुमारे ८६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. खरंतर मनुष्य हा ‘समूहप्रिय’ प्राणी आहे. त्याला माणसांच्यात, आपल्या लोकांच्यात राहायला आवडते; पण पाटण तालुक्यातील शंभरवर गावांतील हजारो लोकांना आपल्या लोकांपासून दूर राहावे लागत आहे. ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत घडलो; त्या मातीशी, तिथल्या लोकांशी त्या तालुक्याशी लोकांची नाळ जोडलेली असते; पण धरण, अभयारण्य अन् आता व्याघ्रप्रकल्प जणू लोकांची नाळच तोडण्याचा प्रयत्न करतंय की काय? अशी परिस्थिती आहे. कोयना अभयारण्यनिर्मितीच्या अगोदरही जंगलातील वन्यप्राणी जंगलातच राहत होते. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, कुरणे, पाणवठे जंगलातच होते. आतील ६० गावे आता उठवली. आता व्याघ्र प्रकल्प झाला. गवताची कुरणे नष्ट झाली. फक्त जंगले वाढली, जंगलात पिण्यासाठी पाणीही मिळेना, त्यामुळे रानडुकरे, गवे, बिबट्या, माकडे आदी रानटी प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत. याचा भयंकर त्रास आज पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. कधी मनुष्यावर हल्ला, तर कधी शेळ्या-मेंढ्यांचा बळी, अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. इतकेच काय; पण गहू, हरभरा, जोंधळा, मका, भात, नाचणी अशी पिके वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई अत्यंत तोकडी असून हजार-पाचशे रुपये हातावर पडत आहेत. (क्रमश:)खुंटीला टांगून ठेवल्यात बंदुका... ‘शिकार’ हा तर माणसाचा पूर्वीपासून चालत आलेला छंद अन् जगण्याचा भागही आहे. पूर्वी लोक शिकार करूनच आपली उपजीविका चालवित होते; पण आता वनविभागाने शिकार बंदीचा कायदा अधिक कडक राबवायला सुरुवात केल्याने शेती अन् स्वसंरक्षणासाठी परवाने असणाऱ्या बंदुका आता खुंटीला टांगून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंदूक आहे उशाला मारायचं कशाला? हा प्रश्न सुटत नाही. अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे ! कोयना व चांदोली अभयारण्यांचा विळखा तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. वन्यप्राणी अन् वनकर्मचाऱ्यांचा त्रास येथील लोकांना होत आहे. त्यामुळे लोक वैतागले आहेत. शेतातील पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत असून, उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अनेक तरुण उद्योग, नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणेकडे वळाले आहेत. त्यामुळे निवी, कसणी सारख्या अनेक गावांत पन्नास टक्के घरांना कुलपे लागलेली दिसतात. मी सध्या आमदार नाही. मात्र, माझ्या तालुक्यातील लोकांना वनकायदे व कोअर, बफर झोनचा त्रास होऊ नये म्हणून मी नेहमीच प्रयत्नरत आहे. पर्यावरण रक्षणाबरोबर माणसाचेही रक्षण करा, ही माझी भूमिका आहे. लोकांच्या न्याय मागण्यांसाठी मी लढा उभारला आहे. -विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार, पाटण