शिरवळ : परिसरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये न्याय मिळावा या अशा विविध मागण्यांकरिता शिरवळ येथील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पायी शिरवळ ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असा अर्धनग्न (चड्डी, बनियन आंदोलन) मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिरवळ ग्रामदैवत श्री अंबिका माता मंदिरामध्ये आरती करून अर्धनग्न (चड्डी, बनियन आंदोलन) मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, शरद ताटे, सागर पानसरे, सूरज राऊत, हितेश जाधव, आंदोलनकर्ते भाजप कार्यकर्ते इम्रान ऊर्फ पप्पू काझी, अंजिक्य ऊर्फ पप्पू कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी अर्धनग्न मोर्चा आशियाई महामार्ग ४७ वरून साताराकडे पायी मार्गस्थ झाला.
फोटो..
११ शिरवळ
शिरवळ ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असा अर्धनग्न (चड्डी, बनियन आंदोलन) मोर्चाला सुरुवात करण्यात आली.