शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पिंपरीतील दीडशेजणांना गॅस्ट्रोसदृश साथ

By admin | Published: May 02, 2017 11:49 PM

पिंपरीतील दीडशेजणांना गॅस्ट्रोसदृश साथ

रहिमतपूर : ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने गॅस्ट्रोने कोरेगाव तालुक्यातील पिंपरीत थैमान घातले आहे. १५० पेक्षा जास्त ग्रामस्थ जुलाब व उलटीने त्रस्त आहेत. गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या त्रासाने अनेकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिंपरी येथील ग्रामदेवतेची २९ व ३० एप्रिलला यात्रा पार पडली. यात्रेपूर्वी वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणी तपासणी करणाऱ्या पथकाने दि. २७ रोजी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीतील पाण्यात टीसीएल पावडरचे प्रमाण कमी आहे, पाणी पिण्यास वापरू नये, अशी सूचना लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीला केली होती. दरम्यान, सरपंच नारायण पवार यांनी विहिरीतील पाण्यात टीसीएल पावडर प्रमाणात टाकण्याची सूचना ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिली होती, परंतु संबंधित कर्मचाऱ्याने टीसीएल पावडर विहिरीतील पाण्यात न मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ उद्भवल्याची शक्यता ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.अनेक नागरिकांना जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गर्दी केली. रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी वाठार आरोग्य केंद्रातील कर्मचारी पिंपरी येथील उपकेंद्रात पाठवून गावातच उपचार करण्यास सुरुवात केली. जुलाब, उलटी या त्रासामुळे अशक्तपणा आलेल्या रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करून तत्काळ सलाईनद्वारे उपचार केले जात आहेत. लहान मुलेही जुलाब, उलटीने त्रस्त आहेत.काही रुग्ण रहिमतपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील यांनी पिंपरी येथील उपकेंद्रास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यात्रेला आलेले अनेक पै-पाहुणे गॅस्ट्रोच्या साथीत सापडले आहेत.रुग्णांसाठी बाळसिद्ध हायस्कूल रिकामे पिंपरी येथील उपकेंद्रात रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना दाखल करण्यासाठी बाळसिद्ध हायस्कूल रिकामे करून त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था केली आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, कोरेगाव गटविकास अधिकारी, आदींनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच डॉ. दिलीप माने यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हास्तरावरून तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्ससह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.