,.........
संत रोहिदास जयंती उत्साहात
सातारा : सातारा जिल्हा संत रोहिदास चर्मकार संस्था सातारा यांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांचा ६२३ वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रम करण्याच्या बार्शी भूमीवर असलेल्या सर्व शासकीय नियमांचे पालन करून पार पडला. यावेळी नीलेश बळी, डॉ. रमाकांत साठे, अमित शिंदे, नितीन चव्हाण, सुनीता चव्हाण यांनी संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन केले.
,.....
त्रिशंकू भागात पथदिवे बसवण्याची मागणी
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने त्रिशंकू भागातील गोडोली साई मंदिर झोपडपट्टी मोरे कॉलनी यशवंत कॉलनी बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसर ठक्कर सिटी आदी विभागासह त्रिशंकू भाग महापालिकेच्या अखत्यारीत आला आहे. हा भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला होता व आहे. अनेक वर्षे प्रलंबित असणारी सातारा शहराची हद्दवाढ शासनाने मंजूर केली आहे. या वाढीमुळे त्रिशंकू फाटा सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आला आहे. या भागातील दिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे रात्री नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागातील कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले दिसतात. ही समस्या सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
........
खंडाळ्यात विनामास्कप्रकरणी दंड
खंडाळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडाळा शहरातील शिवाजी चौकात पोलीस व नगरपंचायत कर्मचारी यांनी विनामास्कप्रकरणी कारवाई करून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाजी चौकात पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर, विठ्ठल पवार, नगर पंचायत कर्मचारी गाडे यांनी तीन हजार रुपये दंड वसूल केला.