ाातारा : ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ म्हणत ‘रिमझिम गिरे सावन’ची साद घालून ‘रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा’ म्हणत ‘आने वाला पल जाना वाला हैं’ या वास्तवाचे भान सखींना देत ‘लुंगी डान्स’वर बेभान नाचायला लावलं, ते अरविंद मोटे आणि सहकाऱ्यांनी. बाहेर पडणाऱ्या पावसापेक्षाही अडीच तास देहभान विसरून प्रत्येक गाण्यावर थिरकणाऱ्या सखींनी टाळ्यांच्या वर्षावात अवघे सभागृह चिंब केले.‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘रिमझिम बरसात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी अरविंद मोटे, हॉटेल सुर्वेज्चे माधव सुर्वे व कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती जिओ फ्रेशचे डॉ. मधुकर खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी लोकप्रिय ठरलेल्या सरगम पॅलेस म्युझिक इन्स्टिट्यूटचे अरविंद मोटे आणि सहकारी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रत्येक दशकात लोकप्रिय झालेल्या श्रवणीय गाण्यांचा आस्वाद घेताना सखींनी आपल्या सर्व चिंता आणि संसारिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून नृत्यही केले. ‘तुझे सब हंै पता मेरी माँ’ हे सौरभ इंगवले आणि ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे तुषार बोडरे यांच्या गाण्यांनी डोळ्यांच्या कडा पाणावल्या. शर्वरी काशीद च्या ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’ याने वातावरण भक्तिमय झाले.मोटे यांच्या बरोबर गिटारिस्ट नीलेश देशपांडे, रवींद्र सापते, स्वप्निल किर्दत, राज कुंभार यांनी गिटारच्या जादुमयी तारा छेडल्या. की बोर्डवर सचिन शेवडे, तन्मय भोसले, आदित्य भोसले यांनी तर तबल्यावर मिलिंद रेवडे, आॅक्टोपॅडवर विजय कांबळे यांनी संगीत साथ दिली. तर रवी जावलेकर, अमोल पवार, सौरभ इंगवले, अदिती पवार, तुषार बोडरे यांच्या आवाजाने सखींवर मोहिनी घातली. (प्रतिनिधी)‘प्रकृती जियो फ्रेश’ यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. अतिशय प्रभावी ग्राहकप्रिय उत्पादने ‘जियो फ्रेश’ने बाजारपेठेत आणली आहेत. जुलै महिन्याचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यात सखींना एस. एस. एंटरप्रायजेस मार्फत ईस्त्री, कास हॉलिडेज रिसॉर्टमार्फत एक दिवसीय पॅकेज, इम्प्रेशन ब्युटीपार्लरमार्फत फेशियल, सुर्वेज प्युअर नॉन व्हेज तर्फे दहा सखींना जेवण, आनंद कृषी पर्यटन मार्फत तीन सखींना शिवारसहल आहेत.
‘रिमझिम बरसात’मध्ये सखी ओल्या चिंब
By admin | Published: July 23, 2015 9:44 PM