शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

व्यापार करा पण, झाड तोडायचा ‘उद्योग’ नको; हरित साताराचे अभिनव आंदोलन

By प्रगती पाटील | Published: June 17, 2024 4:13 PM

सातारा : व्यापार करताय करा पण झाड तोडायचा ‘उद्योग’ नको.., आम्हीं म्हणतोय वाचवायचं, ‘ह्यो’ म्हणतोय तोडायचं.. असे फलक घेऊन रस्त्यावर ...

सातारा : व्यापार करताय करा पण झाड तोडायचा ‘उद्योग’ नको.., आम्हीं म्हणतोय वाचवायचं, ‘ह्यो’ म्हणतोय तोडायचं.. असे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सातारकरांनी आज राजपथावर मूक निदर्शने केली.कमानी हौद ते जुना दवाखान्याच्या दरम्यान पालिकेने लावलेल्या झाडावर शनिवारी रात्री दोन अनोळखी तरुणांनी कोयता चालवत डेरेदार, सावली देणारे झाड तोडण्याचा उद्योग केला. एका जागरूक नागरिकाने या कृत्याचे मोबाईलवर शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधिताने तिथून पळ काढला. तथापि तोपर्यंत झाडाच्या निम्म्याहून अधिक फांद्या तोडल्या गेल्या होत्या. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सातारकरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.अर्धवट तोडलेल्या झाडाचे जतन व्हावे, बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करावी, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा या हेतूने आज हरित सातारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी झाडाजवळ विविध जागृतीपर फलक हातात घेऊन मुक निदर्शने केली. यावेळी स्थानिक रहिवाशी व रिक्षा थांबा संघटनेचे सदस्यही मुक आंदोलनातआंदोलनात सहभागी झाले होते.सलग आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीने झाड तोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. ही बाब आम्ही नगरपालिकेच्या निदर्शनास आणून देत असून नगरपालिकेने लावलेले झाड बेकायदेशीरपणे तोडणाराचा शोध घेऊन त्याच्यावर वृक्ष अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेनुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी हरित साताराचे कार्यकर्ते उमेश खंडूजोडे व संजय मिरजकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.या आंदोलनात ‘हरित सातारा’चे संजय मिरजकर, उमेश खंडूजोडे, सुधीर सुकाळे, संजय झेपले, अंकुश मांडवकर, दत्ता चाळके, दिलीप भोजने, निखिल घोरपडे, प्रकाश खटावकर, अमृता भोसले, साईराज पवार, अरुण मोहिते, शशिकांत मोहिते, मोहसीन शेख, फरुक सय्यद, राजेश तारू, संतोष भिलारकर, गणेश राजमाने, प्रकाश मराठे, शशिकांत देडगे, स्वराज मिरजकर, शैलेश साळुंखे, सोमनाथ भोसले, अमर रजपूत, नौशाद शेख, शौकत मुलाणी आदी सहभागी झाले होते.

पर्यावरणाचे सुविचार अन् झाडाची कत्तलराजपथावर एका दुकानाचा बोर्ड स्पष्ट दिसत नाही म्हणून या डेरेदार झाडाची कत्तल करण्याचा प्रयत्न सजग सातारकरांनी हाणुन पाडला. हे झाड इतके दाट वाढले होते की त्याखाली बसायला दोन बाकडी ठेवण्यात आली होती. परिसरातील सजग नागरिक येथे असलेल्या फलकावर रोज पर्यावरणीय सुविचार लिहित होते. वृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न झाला त्यादिवशी आणि आजही सुचना फलकावर ‘झाडे लावा झाडे वाचवा’ असा संदेश लिहिण्यात आला होता.

राजपथावर झाडाची होणारी कत्तल थांबावी यासाठी आंदोलन केले. पर्यावरणासाठी झाडे लावता येत नसतील तर झाडे तोडूही नका असा संदेश आम्ही दिला आहे. विद्युत वाहिनीचे कारण सांगणाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात हे कुकर्म का केले याचा जाब पालिका प्रशासनाने संबंधितांना विचारावा आणि योग्य ती कारवाइ करावी. - संजय झेपले, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन