उंब्रज : इंदोली (ता. कऱ्हाड) येथे दोन एकर शेतातून काढलेला हरभरा व वीस गुंठे शेतातून काढलेले खपली गहू अज्ञातांनी जाळले. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
इंदोली येथील प्रगतिशील शेतकरी प्रदीप निकम यांनी आपल्या दोन एकर शेतातून हरभरा हे पीक काढले. तसेच वीस गुंठे क्षेत्रातून खपली गहू काढला. हे पीक त्यांनी वाळण्यासाठी शेतात एकत्र करून ठेवले होते. शनिवारी रात्री अज्ञातांनी हे पीक पेटवून दिले. त्यामध्ये गहू व हरभरा जळून खाक झाला. रविवारी सकाळी प्रदीप निकम हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता पीक जाळल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत प्रदीप निकम यांनी उंब्रज पोलिसांत तक्रार दिली आहे.
शेतकऱ्याने शेतात पिकवलेले पीक जाणीवपूर्वक पेटवणारी विकृती पोलिसांनी तातडीने शोधून काढून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी इंदोली परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
फोटो : १४केआरडी०७
कॅप्शन : इंदोली (ता. कऱ्हाड) येथील प्रदीप निकम यांच्या शेतातील काढणी केलेला गहू व हरभरा पीक अज्ञाताने पेटवून दिले. (छाया : अजय जाधव)