शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

किरीट सोमय्या यांना विरोध करू नका; हसन मुश्रीफ यांची जनतेला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 1:18 PM

सोमय्यांना आपल्या कागल तालुक्याचा विकासही पाहु द्या. अशा शब्दात  त्यांनी उपस्थितांची समजुत काढली.

जहांगीर शेख

कागल :भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलेले आरोप चुकीच्या व ऐकीव माहीतीवर आधारलेले आहेत. आम्ही याबद्दल योग्य ती कागदोपत्री  कारवाई करूच. पण माझ्यावर प्रेम करणारया जनतेने संयम ठेवावा. जो पर्यंत तुम्ही लोक आणि प्रमेश्वर माझ्या पाठीशी आहात तो पर्यंत मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. किरीट सोमय्या यांना कागल तालुक्यात येऊ द्या. विरोध करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पंधरा दिवसानंतर ते गुरूवारी रात्री उशिरा कागलमध्ये आले. म्हणुन त्यांना भेटण्यासाठी मतदार संघातील लोक आज पहाटेपासून  त्यांच्या निवासस्थानी झुंडीने येत होते. ग्रामीण  महिलांची तसेच तरूणांची संख्या लक्षणीय होती.  मंत्री मुश्रीफ यांनी चार वेळा माईकवरून उपस्थितीतांशी संवाद साधुन संताप व्यक्त करणारया कार्यकर्त्यानां शांत करण्याचा व समजावण्याचा प्रयत्न केला. हे केवळ माझ्या विरोधात नव्हे तर महाविकास आघाडी सरकार  विरुद्धचे षडयंत्र आहे. म्हणून सोमय्याकडे दुर्लक्ष करा. ते येणार त्या दिवशी टि व्ही बघु नका. शेतात जाऊन काम करा. सोमय्यांना आपल्या कागल तालुक्याचा विकासही पाहू द्या. अशा शब्दात  त्यांनी उपस्थितांची समजूत काढली.

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफ