शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

हातभट्टी : चार दिवसांत जिल्ह्यात ३१ छापे!

By admin | Published: June 23, 2015 11:51 PM

दारू दिली ओतून : ‘मालवणी’ दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय; लाखावर मुद्देमाल हस्तगत ---लोकमत विशेष

राजीव मुळ्ये- सातारा  -मुंबईतील मालवणी भागात हातभट्टीच्या विषारी दारूने शंभरावर बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. ही दुर्घटना घडल्यापासून आतापर्यंत चार दिवसांत या विभागाने जिल्ह्यात तब्बल ३१ ठिकाणी छापे घातले आहेत. एक लाख दहा हजारांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.मालवणी येथील विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात कोणती खबरदारी घेतली जात आहे, याची माहिती ‘लोकमत’ने घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागान मालवणी दुर्घटनेनंतर ३१ छापे घातले. तसे पाहता, पूर्वीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात अगदीच तुरळक प्रमाणात हातभट्टीची दारू येते किंवा तयार केली जाते. महिलांनी केलेले आंदोलन, वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर छाप्यांमध्ये केलेली वाढ यामुळे हातभट्टीची दारू जवळजवळ हद्दपार झाली होती. मात्र, त्यानंतर कुठे-कुठे या व्यवसायाने तोंड वर काढले होते.उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूधंदे सुरू असलेल्या ठिकाणांची माहिती या विभागाला मिळत असते. त्यानुसार दर आठवड्याला छाप्यांचे नियोजन केले जाते. नियमित छापासत्र सुरू होतेच; तथापि मालवणी दुर्घटना घडल्यानंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. गेल्या चार दिवसांत अनेक हातभट्ट्यांवरील दारू नष्ट करण्यात आली असून १ लाख १० हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालकांनी सर्व अधीक्षकांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. या विभागाकडील मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना विनंती करून पोलिसांच्या मदतीने छापासत्रे सुरू करावीत, असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे छापे घालून उरलीसुरली हातभट्टी जिल्ह्यातून हद्दपार करण्यास सज्ज झाला आहे.या ठिकाणांवर आहे नजर...जिल्ह्यात हातभट्टीची दारू हल्ली अगदीच तुरळक ठिकाणी तयार होत असली किंवा विकली जात असली तरी फलटण, खंडाळा, माण, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात उत्पादन आणि विक्रीची अनेक ठिकाणे असल्याने या भागावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. नुकत्याच घातलेल्या छाप्यांमध्येही या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.४फलटण : ढवळ, गुणवरे, मुंजवडी, बागेवाडी, साठेफाटा ४खंडाळा : वडगाव, पिसाळवाडी, शिरवळ, लोहोम, नायगाव, शिंदेवाडी, जवळे ४खटाव : पुसेगाव, खटाव, राजापूर, कातरखटाव, कलेढोण, मायणी ४माण : गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, शिंगणापूर, कुळकजाई, मोही, मार्डी, नरवणे, राणंद, बिदाल, आंधळी, पिंपरी, म्हसवड, काळचौंडी, वरकुटे-मलवडी, पळशी, नरबटवाडी, पुळकोटी, शिरताव ४कऱ्हाड : कार्वे ४पाटण : नाडे, कोयनानगरहातभट्टीच्या दारूमध्ये काळा गूळ आणि नवसागर हे प्रमुख पदार्थ असतात. तेदोन्ही शरीराला घातक असतात. त्याव्यतिरिक्त दारूत कुजक्या फळांच्या रसापासून रसायनापर्यंत वाट्टेल ते मिसळले जाते. त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. मालवणीची दुर्घटना पाहता कोणीही असुरक्षित, अवैध दारूचे सेवन करू नये आणि आसपास विकली जात असेल, तर आम्हाला माहिती द्यावी.- प्रदीप वाळुंजकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग