लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गुन्हा केल्यानंतर लपून बसण्यात माहीर असलेले २० आरोपी एक, दोन नव्हे, तर तब्बल २० वर्षांपासून गायब आहेत. हे सर्व मोस्ट वाॅन्टेड आरोपी असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडले. मात्र, तरीही ते सापडले नाहीत. इतक्या वर्षांपासून हे सर्वजण पोलिसांना गुंगारा देत आहेत. मात्र, जनतेनेही सतर्कता दाखवून हे मोस्ट वाॅन्टेड आरोपी दिल्यास पोलिसांना कळवणं गरजेचे आहे.
फरार असलेले हे आरोपी खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेले आहेत. यातील दोन आरोपी, तर २४ वर्षांहून अधिक काळ फरार आहेत. त्यामध्ये परशुराम प्रशांत उर्फ बाळू तुंगतकर (रा. बारी बुद्रुक, ता. खंडाळा), किसन नामदेव जाधव (रा. भूषणगड, ता. खटाव) यांचा समावेश आहे. या दोघांवर मर्डरचा आरोप आहे.
चाैकट : हे आहेत मोस्ट वाॅन्टेड आरोपी
परशुराम तुगतकर (रा. बारी बुद्रूक, ता. खंडाळा), रिबिन हुंकाऱ्या भोसले, शिवा खंडू भोसले (खंडाळा), किसन जाधव (रा. भूषणगड, ता. खटाव), किसन सदाशिव कदम (रा. सोनके, ता. कोरेगाव), अनिल रघुनाथ बनसोडे (रा. शिरवळ), जयंत बाबूराव कदम (रा. समर्थमंदिर, मंगळवार पेठ, सातारा), अंजली शिवाजी खवले, विजय बाबू गायकवाड, लक्ष्मी वियज गायकवाड (माजगावकर माळ, झोपडपट्टी, सातारा), अकबऱ्या रिकवऱ्या काळे (रा. मोळ, ता. खटाव), नकात्या शिवल्या काळे (रा. जक्शन, ता. इंदापूर, जि. पुणे), मंगेश उर्फ बहिऱ्या पाटल्या भोसले (रा. सोनगाव, ता. फलटण), सर्फराज बादशहा मुलाणी (रा. गुरुवार पेठ, सातारा), संतोष धाबू बावधणे (रा. मालदेव, पो. ठोसेघर, ता. सातारा), मुक्या लाल्या भोसले, राहुल मुक्या भोसले, फाळक्या मुक्या भोसले (रा. साठेफाटा, ता. फलटण), सागर तुकाराम बाबर (रा. शिवाजी चाैक, खंडाळा), संज्या नमन्या पवार (रा. भिलकटी, ता. फलटण)
चाैकट : मृत्यूनंतरही तपास सुरूच
यातील बहुतांश आरोपींचा म्हणे मृत्यूही झाला असेल. पण जोपर्यंत पोलिसांच्या रेकाॅर्डवर त्यांचा मृत्यू येत नाही. तोपर्यंत हे आरोपी पोलिसांसाठी जिवंतच आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही पोलिसांना तपास सुरूच ठेवावा लागत आहे.
चाैकट : चोवीस वर्षे झाले सापडेनात..
खंडाळा आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तीन आरोपी तब्बल २४ वर्षांपासून फरार आहेत. रिबीन भोसले आणि शिवा भोसले हे अट्टल दरोडेखोर आहेत. तर परशुराम तुंगतकर आणि किसन जाधव हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. इतक्या वर्षांपासून ते पोलिसांना गुंगारा देत आहेत.
चाैकट : वाॅन्टेड आरोपींवर इथ गुन्हे दाखल
खंडाळा आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रत्येकी पाच आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. तसेच वाठार, सातारा तालुका आणि लोणंद या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातीलही सात आरोपींचा समावेश आहे.
कोट : मोस्ट वाॅन्टेड आरोपींचा आम्ही शोध सुरू केला असून, पर जिल्ह्यात अथवा परराज्यांत हे आरोपी वास्तव्यास असू शकतात. त्यामुळे तपासाला मर्यादा येतात. मात्र, हे आरोपी लवकर सापडतील, यासाठी आमच्या व्ह्यूव रचना सुरू आहेत.
किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा