गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर हळूहळू संक्रमण वाढले. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील शहरी भागात संक्रमणाचा वेग जास्त होता. मात्र, गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यानंतर ग्रामीण भागातही त्याचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना जिल्ह्यासाठी भयावह ठरला होता. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा त्यावेळी बळी गेला होता. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर आणि यावर्षीचा जानेवारी महिना दिलासादायक ठरला. संक्रमण कित्येक पटींनी कमी झाले. बाधितांची संख्याही घटली. त्यामुळे कोरोनाची भीती कमी झाली. मात्र, जानेवारी अखेरपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि काही दिवसांतच गतवर्षीपेक्षाही बिकट परिस्थिती बनली.
फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात टप्प्या-टप्प्याने रुग्णवाढीचा वेग वाढला असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात दररोज दोन हजारांवर बाधित आढळून येत आहेत. तसेच अनेक रुग्णांचा बळीही जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह इतर आरोग्य सुविधांसाठी रुग्णांची फरपट सुरू आहे तर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावरही प्रचंड ताण आहे.
तालुका : एकूण रुग्ण : बाधित गावे : कोरोनामुक्त गावे
सातारा : २१८०० : २१० : ४०
कऱ्हाड : १४७६२ : १९० : ५५
जावली : ४८९३ : १११ : १४
खंडाळा : ५८६१ : ६३ : ०
खटाव : ७५०९ : १४० : ०
कोरेगाव : ८००७ : १६२ : ३६
माण : ६१७४ : ९६ : ५
महाबळेश्वर : ३१५८ : ८६ : १२
पाटण : ३५२० : ७० : ६६
फलटण : ११९३८ : १३५ : २८
वाई : ७२३८ : ११३ : २२
- चौकट
जिल्ह्यात मृत्यूचे तांडव
जावली - ७५
कऱ्हाड - ४१३
खंडाळा - ७८
खटाव - २३२
कोरेगांव - २२४
माण - १२८
महाबळेश्वर - २८
पाटण - ११३
फलटण - १७५
सातारा - ६९७
वाई - १७२
- चौकट
बेडचा लेखाजोखा
तालुका : एकूण बेड : ऑक्सिजन बेड
सातारा : १०८३ : ७२३
कऱ्हाड : ७१० : ४६०
वाई : २४३ : १८३
पाटण : १६१ : १३५
कोरेगाव : १८३ : १६६
खटाव : १९७ : १५१
माण : १०५ : ८८
फलटण : ३३६ : २८०
जावळी : ३० : ३०
महाबळेश्वर : ७४ : ६०
खंडाळा : २०९ : १८८
- चौकट
सातारा, कऱ्हाडवर ताण
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कऱ्हाड व सातारा शहरातील आरोग्य यंत्रणेवर वाढत्या रुग्णसंख्येचा प्रचंड ताण आहे. या दोन्ही शहरांत कोरोना रुग्णालयांची संख्या जास्त आहे तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसह आयसीयू बेडही जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील तीव्र लक्षणे असलेले रुग्ण या दोन्ही शहरांतील रुग्णालयांमध्ये अॅडमिट केले जात आहेत.
- चौकट
माण, खटाव दुष्काळी...
पाटण, महाबळेश्वर दुर्गम
जिल्ह्यांतील माण आणि खटाव हे दोन्ही तालुके दुष्काळी आहेत तर पाटण व महाबळेश्वर तालुक्यात दुर्गम भाग जास्त आहे. त्यामुळे या चार तालुक्यांत पुरेशी आरोग्य व्यवस्था नाही. सातारा व कऱ्हाडवगळता इतर तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे.