शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘त्यांनी’ पीडित महिलांना दिला हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:45 PM

‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जे आपुले’ या संत उक्तीप्रमाणे समाजातील दीन दुबळ्या, गोरगरीब, अनाथ आणि पीडितांची सेवा करून त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वखर्चातून दान देऊन त्यांना आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिती धायगुडे खºया अर्थाने पीडित स्त्रियांची माय बनल्या आहेत.

- दशरथ ननावरे

‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जे आपुले’ या संत उक्तीप्रमाणे समाजातील दीन दुबळ्या, गोरगरीब, अनाथ आणि पीडितांची सेवा करून त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वखर्चातून दान देऊन त्यांना आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिती धायगुडे खºया अर्थाने पीडित स्त्रियांची माय बनल्या आहेत.

भादे, ता. खंडाळा येथील सुनिती धायगुडे यांनी आपला शेती व्यवसाय जपत समाजातील पीडित स्त्रियांच्या संसाराचा आधार होण्याचा अनोखा छंद जोपासला आहे. घरात जाच करून घराबाहेर हाकलून दिलेल्या, वेडसरपणाचा ठपका ठेवून सोडून दिलेल्या आणि कोणाचाही आधार नसलेल्या अनाथ स्त्रियांना आपलं जीवन म्हणजे बोजड आयुष्य वाटू लागतं. समाजातील लोकांकडून होणारी हेटाळणी, पोटाची भूक भागविण्यासाठी करावी लागणारी कसरत, सगळच त्यांच्या वाट्याला आलेलं असतं. अशा महिलांपुढे खरंतर अनेक समस्या उभ्या असतात.

गावोगावी आढळणाºया अशा महिलांबाबत माणुसकीचा एक झरा सुनितीतार्इंच्या रुपाने नेहमीच पाझरत राहिला. स्वत:साठी सगळेच जगतात; पण दुसºयासाठी थोडं जगावं, या विचाराने त्यांनी कामाला प्रारंभ केला. २०११ मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांच्या आदिवासी आश्रमात भेट दिल्यानंतर त्यांना समाजकार्याची आणखी प्रेरणा मिळाली. त्यांनाच गुरू मानून आश्रमातील विशाल महासागराएवढं काम उभारणं शक्य नसलं तरी थेंबाएवढं काम निश्चित करु शकतो ही भावना त्यांनी जोपासली.

महाराष्ट्रात कुठेही भ्रमंती करत असताना पीडित महिला आढळल्या किंवा कोणीही फोन करून माहिती दिली तरी त्या मदतीसाठी धावून जातात. त्यांच्या घरच्यांचा शोध घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना सुपूर्द करतात, अन्यथा स्वत:च्या खर्चाने त्यांचे पुनर्वसन करतात. आजपर्यंत शेकडो पीडितांनी जगण्याची उभारी त्यांनी दिली. काही महिलांचा त्या त्यांच्या मुलांसह स्वत:च्या घरी सांभाळ करीत आहेत.

शेतीची कामे करून त्यातील उत्पन्नाचा वाटा त्यासाठी खर्ची घालत आहेत. याशिवाय त्यांनी तुटणाºया संसाराचा धागा बनून अनेक दाम्पत्यांना घटस्फोटापासून परावृत्त केले. घरीच दोघांची समजूत घालून स्वत:च्या मुलीप्रमाणे साडी-चोळीनेओटी भरून संसाराच्या नव्या पर्वाला पाठवणी केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. याशिवाय निराधारांना आधार देत गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.

सामाजिक कार्यासाठी त्यांना समाजभूषण पुरस्कार, महिला शेतिनिष्ठ पुरस्कार, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, झुंझार महिला पुरस्कार, आदर्श समाजरत्न पुरस्कार, रणरागिणी हिरकणी पुरस्कार, प्रियदर्शिनी अस्मिता अ‍ॅवॉर्ड, द प्राईड आॅफ इंडिया भास्कर भूषण पुरस्कार, स्टार वुमन आयकॉन अ‍ॅवॉर्ड आणि महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पीडित महिलांचे पुनर्वसन म्हणजे केवळ त्यांच्या घरच्यांकडे सुपूर्द करणे नव्हे तर एखाद्याच्या घरची परिस्थिती बेताची असेल तर त्या पीडित महिलेच्या अर्थार्जनासाठी काम उपलब्ध करून देणे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. इतकं सारं करताना या दुर्लक्षित महिलांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करतात. त्यामुळे आपुलकीची जाणीव कायम मनामध्ये घर करून राहते. स्वत:च्या उत्कर्षासाठी झगडणारी माणसं पावला-पावलावर भेटतात; पण पीडितांच्या आत्मसन्मासाठी त्यांनी चालवलेलं काम हे निश्चित प्रेरणादायी आहे.

समर्थपणे केले पीडितांचे पुनर्वसनसामाजिक कार्याला अधिक गती प्राप्त व्हावी, यासाठी पुणे येथील दक्ष फाउंडेशनच्या सहकार्याने सुनितीतार्इंनी या कामावर अधिक भर दिला.हे काम करताना समाजातील अनेक चांगल्या-वाईट प्रवृत्तींचा त्यांना सामना करावा लागला; पण न डगमगता त्यांनी धिरोदात्तपणे परिस्थितीशी सामना केला. कित्येकदा पीडित महिलांच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागले आहे. मग यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागते. पीडितांचे पुनर्वसन हे काम एकट्याने समर्थपणे करणे खूपच कष्टदायी आहे; पण सुनितीतार्इंना या कामात मुलगा अ‍ॅड. सोहेल धायगुडे आणि त्यांचे सहकारी दयाभाऊ खरात हे सातत्याने सहकार्य करीत असतात.

- ९६३७३६०००५

गावोगावी रस्त्याने वेडसरपणा गुंडाळून वावरणाºया महिला पाहिल्या की जीव कासावीस व्हायचा. इतर महिलांसारखा यांनाही जगण्याचा अधिकार आहे, मग असं का ? म्हणून त्यांच्यासाठी काम करायचे ठरवले. निराधारांना आधार मिळवून देणं हेच जीवनाचं ब्रीद बनलं आहे. हे काम यापुढेही सक्षमपणे सुरू ठेवणार आहे.- सुनिती धायगुडे

टॅग्स :Navratriनवरात्रीSatara areaसातारा परिसर