शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कासला जाताना दिवसा लावावी हेडलाईट , धुक्याचा परिणाम : वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 8:39 PM

जागतिक वारसास्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे कास पठार जिल्'ातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात आहे. या परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे.

पेट्री : जागतिक वारसास्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे कास पठार जिल्'ातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात आहे. या परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे. तसेच सध्या शहराच्या पश्चिमेस दिवसभर दाट धुके पसरत असून, समोरून आलेली वाहने दिसत नसल्याने आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे ना ? हे पाहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अपघात टाळता येणे सोपे आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेस सातासमुद्रापार ओळख असणारे कास पठार, भारतातील सर्वाधिक उंचीचा ओळखला जाणारा वजराई धबधबा, अन्य इतर कोसळणारे धबधबे, दाट धुक्यात हरवून जाणारा कास तलाव तसेच कास बामणोली परिसरातील मनाला मोहिनी घालणारे सर्वत्र निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. तसेच शनिवार, रविवारी शेकडो वाहनांच्या रांगा या परिसरात दिसतात. सातारा-बामणोली मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक वळणे असून, सध्या परिसरात दाट धुक्याच्या दुलईसह मुसळधार पाऊस पडतो.

दिवसभर असणाऱ्या या दाट धुक्यात समोरून येणाºया वाहनांचा अंदाज यावा, यासाठी पर्यटकांनी आपल्या वाहनांची हेडलाईट सुरू करण्यासंदर्भात सावधान असणे अत्यावश्यक आहे. कारण कित्येकदा वाहनांची हेडलाईट सुरू नसल्याने समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होऊन एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात फिरायला येणाºयांनी आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे की नाही, याची तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

बºयाचदा हेडलाईट सुरू नसल्याने दुसरे एखादे वाहन अगदी जवळ आल्यावर समजते. तेव्हा वाहनांवर नियत्रंण ठेवणे अवघड जाते. तसेच ऐनवेळी हेडलाईट सुरू असण्याअभावी समोरून आलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घ्यावे तर रस्त्यालगत लाल मातीवरून वाहन घसरण्याची अधिक शक्यता आहे. तसेच परिसरातील शेतकरी वर्गाची रस्त्यावरून सतत ये-जा सुरू असल्याने वाहन दिसले जावे, यासाठी हेडलाईट सुरू असणे गरजेचे आहे.पोलिसांची हवी करडी नजर !सध्या कास पठार परिसरात फिरायला येणाºयांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिवसभर पावसाची रिमझिम त्यात दाट धुक्याची दुलई पाहता दूरवरून समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यात स्टंट अथवा हुल्लडबाजी करणाºयांकडून मोठ्या वेगाने वाहने चालविली जात असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यांच्यावर पोलिसांची कायमस्वरूपी करडी नजर असणे अत्यावश्यक आहे.

अशी घ्यावी काळजी !- वाहनाचा वेग कमी असावा.- हेडलाईट सुरू ठेवूनच वाहने चालवावीत.-वाहनाचे वळण घेतेसमयी इंडिकेटर सुरू असावेत.- वेळप्रसंगी दाट धुक्यातून वाहन चालविताना पार्किंगलाईट सुरू असावी.- अधीमधी वाहने रस्त्यावर उभी करू नये. वेळप्रसंगी गरज भासल्यास पुष्कळ जागा पाहून गाडी रस्ता सोडून बाजूला पार्क करावी.

आपल्या चुकीमुळे समोरून येणाºया वाहनाला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, तसेच भविष्यात दुर्दैवी घटना टाळावी, यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी दाट धुक्यातून प्रवास करताना आपापल्या वाहनांची हेडलाईट दिवसादेखील चालू ठेवणे आवश्यक आहे. सातारा कास मार्ग वळणावळणाचा व घाट रस्ता असल्याने दिवसा तसेच रात्रीदेखील रस्ता दिसला जावा, यासाठी जिलेटीनचा पिवळा कागद हेडलाईटला लावून गडद पिवळा उजेड पडून रस्ता स्पष्ट दिसण्यास मदत होते.-ओंकार मोहिते, पर्यटक, ठाणे