सातारा : महिलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत त्याविषयी जनजागृती करण्यासाठी साताऱ्यातील श्रीगौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने मोफत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे पन्नासहून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
या शिबिरात हिमोग्लोबिन, कॅल्शियम, थायरॉईड तसेच रक्तातील साखरेची पातळी तपासण्यात आली. या शिबिराला संत निरंकारी नारी सत्संग मंडळ, दौलत नगर, सातारा यांचे विशेष सहकार्य लाभले.
मंगल घाडगे, कल्पना निकम, लता राजेमहाडिक, पोटे मॅडम, सुजाता जाधव आदी महिलांची विशेष उपस्थिती होती. तसेच श्रीगौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटरचे नीलेश बळी, डॉ. अनिरुद्ध जगताप हेदेखील उपस्थित होते. राहुल परदेशी, वैष्णवी जोशी आणि अरबाज शेख यांच्या नियोजनाखाली हे शिबिर पार पडले. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फोटो कैप्शन :
आरोग्य तपासणीदरम्यान श्रीगौरीशंकरच्या वैष्णवी जोशी, मंगल घाडगे.
.............