अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. यादिवशी कऱ्हाड तालुक्यातील विविध गणेश मंडळे विसर्जनासाठी येथील प्रीतिसंगमावर दाखल होतात. आकर्षक सजावटी तसेच दरबार मिरवणुका आणि गुलालाची उधळण करत हजारो युवक, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते तसेच मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करणारे नागरिक पहाटेपर्यत ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला निरोप देतात. मात्र, गतवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट राहिले आहे. श्रींच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव काळात कोठेही उत्साह दिसून आला नाही. सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
कऱ्हाड ग्रामीण व शहरी भागातील बऱ्याच ठिकणी गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवली. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्सव साजरा न करता अगदी साधेपणाने फक्त मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण उत्सव काळात कोठेही ध्वनी प्रदूषण जाणवले नाही. ना गुलालाची उधळण, ना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण तालुक्यात आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले.
- चौकट
मूर्ती संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
ढोल-ताशाशिवाय आणि गुलालाची उधळण टाळून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन यंदा पाहायला मिळाले. शहरात पालिकेने ‘गणेशमूर्ती संकलनासाठी पालिका दारी’ हा अभिनव उपक्रम रावबला. या उपक्रमाला दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनापासून ते अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांनी कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमावर न जाता पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये मूर्ती दिल्या.
- चौकट
कडक पोलीस बंदोबस्त तैनात
कृष्णा आणि कोयना नद्यांची पाणीपातळी वाढल्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्राकडे जाण्यास तहसीलदारांनी बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात नदीकाठावर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नदीपात्राकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेटस् लाऊन बंद करण्यात आले होते.
फोटो : २०केआरडी०५
कॅप्शन : कºहाडच्या प्रीतीसंगमावर पालिका कर्मचाºयांकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत मुर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.
फोटो : २०केआरडी०५
कॅप्शन : कºहाडात जलकुंडातील पर्यावरणपुरक गणेशमुर्ती विसर्जनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट देऊन मुर्ती विसर्जनस्थळांची पाहणी केली.