शहरं
Join us  
Trending Stories
1
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
4
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
5
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
6
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
7
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
8
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
9
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
10
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
11
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
12
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
13
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
14
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
15
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
16
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
17
"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा
18
Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी
19
ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

थंड महाबळेश्वरही तापलं! साताऱ्याचा पारा ४१ अंशांवर

By नितीन काळेल | Published: May 02, 2024 7:02 PM

अंगाची लाहीलाही; यंदाचे उच्चांकी तापमान 

सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सातारा शहराचा पारा वर्षात प्रथमच ४१ अंशावर पोहोचला. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे तापमानही ३५ अंशावर गेले. त्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली असून अजून एक महिना कसा काढायचा या विवंचनेत जिल्हावासीय आहेत.सातारा जिल्ह्यात मागीलवर्षीपेक्षा यंदा कडक उन्हाळा आहे. सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. दुपारच्या सुमारास तर कडाक्याचे ऊन पडत आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे कमाल तापमानाने ४१ अंशाचाही टप्पा गाठला आहे. सातारा शहरात मंगळवारी ४१ अंशाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. त्याचवेळी जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा ३५.१ अंश नोंद झाला. त्यामुळे थंड हवेच्या महाबळेश्वरातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच ऊन वाढत गेले. पण, एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्णतेचा ठरला. एप्रिलमध्येच सहावेळा सातारा शहराचा पारा ४० अंशावर गेला. त्यातच कायम तापमान हे ३९ अंशावरच राहिल्याचे दिसून आले. आता मे महिन्याला प्रारंभ झाला असलातरी उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी. माण, खटाव, फलटण या तालुक्यात उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. या तालुक्याच्या अनेक भागात ४२ अंशावर पारा गेलेला आहे. यामुळे गावागावांत शुकशुकाट जाणवत आहे. तर शेतीच्या कामावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातही आणखी पारा वाढण्याची चिन्हे आहेत.

तीन दिवस पारा ४० अंशावर..जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची मोठी लाट दिसून आली. त्यामुळे सलग तीन दिवस सातारा शहराचा पारा ४० अंशावर राहिला. दररोजच उच्चांकी पारा नोंद होत गेला. २८ एप्रिलला ४०.५, २९ रोजी ४०.७ आणि ३० एप्रिलला ४१ अंशावर तापमान होते. तर मे महिन्यातही तापमान वाढलेले आहे. गुरुवारी ४०.७ पारा नोंद झाला. यापुढेही जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील अससा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिना हा तापदायक राहण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान