शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
2
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
3
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
4
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
5
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
6
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
7
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
8
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
9
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
10
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
11
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
12
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
13
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
14
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
15
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
16
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
17
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
18
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
19
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
20
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित

साताऱ्यात दमदार पाऊस सुरूच, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ 

By नितीन काळेल | Published: July 20, 2024 6:42 PM

नवजाला १०० तर कोयनेला ८५ मिलीमीटर पर्जन्यमान 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत असून २४ तासांत नवजा येथे १०० तर कोयनानगरला ८५ मिलीमीटरची नोंद झाली. तसेच महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने ५१ टीएमसीचा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे.जिल्ह्यात पाऊस वाढू लागला आहे. विशेष करुन दोन दिवसांपासून पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात संततधार आहे. यामुळे रानावनातून पाणी खळाळून वाहत आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणक्षेत्राही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोयना धरणक्षेत्रात तर संततधार सुरू आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे धरणातील आवक वाढली आहे. परिणामी धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील नवजा येथे १०० मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत नवजाला २ हजार ७२० मिलमीटर पर्जन्यमान झाले. यामुळे नवजाच्या पावसाची तीन हजार मिलीमीटरकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोयना येथे आतापर्यंत २ हजार २८६ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही २४ तासांत ९५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर आतापर्यंत २ हजार १०१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे ४३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ५०.७६ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यामुळे कोयना धरण अर्धे भरल्यात जमा आहे. तरीही अजून धरण पूर्ण भरण्यासाठी ५४ टीएमसी पाण्याची गरज आहे.साताऱ्यात जोरदार सरी..सातारा शहरातही दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस होत आहे. शनिवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले. विशेषत: करुन शहराच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक राहत आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ हाेत चालली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी