फलटण (प्रतिनिधी): फलटण शहर व तालुक्यात विविध ठिकाणी काल मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला असून या पावसाच्या पाण्यात एक कार वाहून जाऊन दोन जण ठार झाले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. फलटण तालुक्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.
फलटण शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून काल रात्री आठ नंतर पावसाने रौद्ररूप धारण केले यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले फलटण शहरातून वाहत जाणाऱ्या बाणगंगा नदीला मोठा पूर आला त्यामुळे नदीकाठच्या अनेक घरात पाणी घुसल्याने या लोकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षित स्थळी हलवावे लागले शहरातील शुक्रवार पेठ, शनी नगर, मंगळवार पेठ, मेटकरी गल्ली ,शिवाजीनगर, पाच बत्ती चौक या भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले.
अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे घरांचे पत्रे वाहून गेले असून काही जणांच्या घरांची पडझड झाली आहे ग्रामीण भागात पण अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे फलटण ते बारामती रस्त्यावरील सोमंथळी गावाच्या नजीक रेल्वे लाईन जवळ मळीचा ओढा या ठिकाणी एक कार ओढ्याच्या पाण्यात वाहून जाऊन त्यामध्ये छगन उत्तम मदने (वय 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय 12) राहणार वारुगड (तालुका माण) यांचा मृत्यू झाला आहे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"