शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

Satara: कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; नवजाला सर्वाधिक पावसाची नोंद 

By नितीन काळेल | Published: June 11, 2024 6:27 PM

धरणात १५ टीएमसी पाणी 

सातारा : जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात लवकरच पाण्याची आवक सुरू होऊ शकते. धरणात सध्या १५ टीएमसीवर पाणी आहे. तर पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस पडत आहे. यामुळे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही शेकडो गावांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा ही विषय होता. त्यामुळे अनेक गावांतून चारा डेपो, छावण्यांची मागणी होत होती. पण, ज्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे तो मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे.कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा भागात दररोजच पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच यामुळे भात लागणीलाही सुरूवात होणार आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात वातावरण पावसाळी झाले. तसेच अनेक गावांतील ओढे वाहू लागले आहेत. बंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे.सोमवारीही माण तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेत जमिनीत पाणी साचून राहिले. परिणामी पेरणीसाठी वाफसा येण्याची वेळ शेतकऱ्यांना बघावी लागणार आहे. सातारा शहरातही ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच अधूनमधून पावसाची हजेरी लागत आहे. परळी खोऱ्यात ही पावसाची चांगली हजेरी लागली आहे.गतवर्षी कोयनेत १२ टीएमसीवर साठा..मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सर्वत्रच पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ९५ मिलीमीटर झाला आहे. तर महाबळेश्वर येथे २८ आणि कोयनानगरला ७१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर एक जूनपासून जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला १९७ मिलीमीटर झाली. तर कोयना येथे १६६ मिलीमीटर पाऊस झालेला आहे.महाबळेश्वरचा पाऊस ९६ मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस लवकर सुरू झाला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पश्चिम भागातील प्रमुख धरणांत लवकरच पाणी आवकही सुरू होण्यास मदत होणार आहे. तर गेल्यावर्षी कोयना धरणात ११ जून रोजी १२.४७ टीएमसी पाणीसाठा होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी