शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक
2
पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही
3
"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार
4
धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत
5
"नेहरू म्हणाले होते, आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली, तर सरकारी सेवांची क्वालिटी...!"; PM मोदींचा मोठा दावा
6
धक्कादायक...! मित्राला धडा शिकवण्यासाठी चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा अल्पवयीन मुलीचा बनाव
7
धक्कादायक! आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं, निक्कीवर हात उगारल्याने मिळाली मोठी शिक्षा
8
शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य
9
सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
10
“२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”
11
"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल
12
“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान
13
विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...
14
"माझा राग देवेंद्रजींवर, कारण...", अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय?
15
भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट
16
पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू
17
"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
18
“संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा
19
Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती?
20
दररोज रिकाम्या असतात शेकडो सिट्स, या ट्रेनमुळे रेल्वेला होतोय कोट्यवधीचा तोटा

सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून! 

By नितीन काळेल | Published: June 18, 2024 6:54 PM

जिल्ह्यात विरोधाभास : पश्चिम भागात उघडीप, काही ठिकाणी तुरळक 

सातारा : जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा असलातरी सध्या उघडीप आहे. पण, पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस होत असल्याने अनेक गावातील ताली फुटल्या, रस्ते वाहून गेलेत. ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच मागील १२ दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असल्याने नुकसानीच्या घटनाही घडू लागल्या आहेत.जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचा. जून ते सप्टेंबरदरम्यान या भागात जोरदार पाऊस पडतो. महाबळेश्वर, कोयना, नवजा या परिसरात तर पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते. तसेच कास, बामणोली, तापोळा भागातही जोरदार वृष्टी होते. याचा फायदा कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी धरणांना होतो. तसेच जून महिन्यापासूनच पश्चिम भागात पाऊस सुरू होतो.पण, यंदा मात्र उलट स्थिती जाणवत आहे. कारण, जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होत आले आहेत. सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. पण, मागील पाच दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात तुरळक स्वरुपात पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रमुख धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही. तर दुसरीकडे माण, खटाव, फलटण या तालुक्यात धुवाॅंधार सुरू आहे.दुष्काळी तालुक्यात मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस पडत आहे. अजुनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. त्यामुळे क्षणातच धो-धो पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. तसेच पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे ताली फुटल्या आहेत. रस्तेही वाहून गेलेत. यामुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत. त्यातच आतापर्यंत दुष्काळी तालुक्यात जूनमधील उच्चांकी पावसाची नोंद झालेली आहे. परिणामी या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला खीळ बसली आहे. आता पाऊस थांबल्याशिवाय पेरणीला वेग येणार नाही, अशी स्थिती आहे.

कोयनेला पाऊस नाही, महाबळेश्वरला अवघा ३ मिलीमीटर..पश्चिम भागात पावसाची तीन दिवसांपासून उघडीप आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला काहीही पाऊस झालेला नाही. तर नवजा येथे फक्त १ तर महाबळेश्वरला ३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात १४.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. सातारा शहरात तर चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. पाऊस मात्र पडत नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfloodपूर