शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

By नितीन काळेल | Published: May 16, 2024 4:04 PM

साताऱ्यासह खटाव, कोरेगाव तालुक्यात पाऊस 

सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून  गुरुवारी सातव्या दिवशीही मेघगर्जनेसह हजेरी लावली. सातारा शहर, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात हा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे. 

मे महिन्याची सुरुवात रखरखत्या उन्हाने झाली असलीतरी मागील आठ दिवसात वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे. दुपारपर्यंत कडक ऊन असते. त्याचबरोबर तीव्र उकाडा जाणवतो. पण दुपारनंतर वळवाचा पाऊस होत आहे. सात दिवसापासून जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत आहे. तसेच यावेळी जोरदार वारेही वाहत आहेत. आतापर्यंत पाटण तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच जावळी तालुक्यातही हजेरी लावली. मात्र या पावसामुळे नुकसानीचाही घटना घडत आहेत. विशेषता करून पाटण तालुक्यातच घरांचे नुकसान अधिक झाले आहे. गुरुवारीही सातारा शहराबरोबरच कोरेगाव आणि खटाव तालुक्यात  वळवाचा पाऊस पडला. 

सातारा शहरात दुपारी तीननंतर ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. या पावसात जोर नव्हता. काही मिनिटेच पाऊस पडला. त्यानंतर रिमझिम सुरू झाली. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. तर शहराच्या पश्चिम भागातील परळी खोरे, पेट्री भागात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. तर कोरेगाव आणि खटाव तालुक्यातही वळीव पावसाने हजेरी लावली. काही वेळच हा पाऊस झाला. तरीही वातावरण थंड होण्यास मदत झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस